Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आठ पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर

आठ पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर

गोंदिया : राज्याच्या गृहविभागानेगुरुवारी (दि.३०) पोलिस विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक जाहीर केले आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील चार पोलिस अधिकारी आणि चार पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक हरिदास पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सहायक पोलिस निरीक्षक संजय जगदेवराव नाईक, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत कृष्णा हत्तीमारे, तसेच पोलिस हवालदार प्रकाश शामलाल गायधने, अनिल आत्मराम कोरे, लियानार्ड बेजामिन मार्टीन व पोलिस शिपाई भास्कर राजेंद्र हरिणखेडे यांना पोलिस महासंचालकाचे पदक जाहीर झाले आहे. पदक जाहीर झालेल्या जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी कौतुक केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES