Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अदानी पॉवर लिमिटेड, तिरोडा येथे 'जागतिक पर्यावरण सप्ताह' उत्साहात

अदानी पॉवर लिमिटेड, तिरोडा येथे 'जागतिक पर्यावरण सप्ताह' उत्साहात

तिरोडा: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अदानी पॉवर लिमिटेड तिरोडा येथे दिनांक ०५ जून ते ११ जून २०२६ दरम्यान 'जागतिक पर्यावरण सप्ताह' अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.

स्टेशन हेड मयंक दोशी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या संपूर्ण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

या वर्षीचा पर्यावरण सप्ताह निसर्गाकडून प्रेरणा: हवामानासाठी, आपल्या भविष्यासाठी या मुख्य संकल्पनेवर आधारित होता. या सप्ताहादरम्यान भव्य ग्रीन रॅली, वृक्षारोपण, स्लोगन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फोटोग्राफी, ऑनलाइन क्विझ आणि कचरा व्यवस्थापन प्रशिक्षण यांसारखे विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात आले.११ जून रोजी अदानी पॉवर परिसरात या सप्ताहाचा शानदार सांगता व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या सोहळ्याला परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली. यामध्ये ग्रामपंचायत गुमधावाडाच्या सरपंच सौ. पद्माताई कंगाली, उपसरपंच श्री. अनिल भगत, खैरबोडीच्या सरपंच सौ. विद्या टेंभरे, चिखली ग्रामपंचायतचे सरपंच कैलास पटले, काचेवनीचे उपसरपंच संतोष चौधरी, आणि मेहंदीपूरचे उपसरपंच श्री. बावणे यांच्यासह इतर ग्रामपंचायतींचे सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी मंचावर स्टेशन हेड मयंक दोशी यांच्यासह ऑपरेशन अँड मेंटेनन्स हेड उदय चव्हाण, सेफ्टी विभागाचे अनुप कुमार सिंग आणि कॉलिटी विभागाचे रामाकृष्णा यांच्यासह इतरही विविध विभागांचे प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

पर्यावरण रक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी - मयंक दोशी

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना स्टेशन हेड मयंक दोशी म्हणाले, "पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ एखाद्या संस्थेची किंवा सरकारची जबाबदारी नसून, ती आपल्या सर्वांची वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. निसर्गाकडून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्या पाहिजेत, तरच आपण आपल्या पुढील पिढीला सुरक्षित भविष्य देऊ शकू." असे सांगून चालू वर्षांमध्ये अदानी पावर च्या वतीने 80000 पेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्यात येईल असे सांगितले.

कार्यक्रमाचे संचलन प्रवीण शहा यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन राहुल शेजव यांनी मानले.हा पर्यावरण सप्ताह यशस्वी करण्यासाठी गिरीश कुलकर्णी व पर्यावरण विभागाची टीम तसेच पावरमेक कंपनीच्या टीमने परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES