सविता बेदरकर यांच्या पुढाकाराने दरवर्षी 'एक दिवा माणुसकीचा' हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत दरवर्षी अनाथ मुलांसाठी दिवाळी फराळ, नवीन कपडे, अन्नधान्य तसेच आर्थिक मदत देऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी हा दिवाळी स्नेहमिलन सोहळा गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी डॉ. सविता बेदरकर यांच्या निवासस्थानी उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला. डॉ. सविता बेदरकर यांच्या या सामाजिक कार्याला हातभार लावता यावा, या उद्देशाने समग्र शिक्षण विभागात कार्यरत असलेले वशिष्ठ खोब्रागडे हे दरवर्षी मित्रपरिवार तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करतात. त्यांच्या या आवाहनाला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध क्षेत्रांतील ५४ दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत देत एकूण ४७ हजार ९०८ रुपयांचा निधी उभा केला. या संकलित निधीचा धनादेश कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), गोंदियाचे प्राचार्य राजकुमार हिवारे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रा. डॉ. सविता बेदरकर यांच्या साऊ फाउंडेशनला सुपूर्द करण्यात आला. यावेळी डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे, सेवानिवृत्त प्राध्यापक अनिल मेश्राम, भगवान नंदागवळी, मधुसूदन दोनोडे, सविताताई अग्रवाल, डॉ. माधुरी नासरे, विश्वजित बागळे, वशिष्ठ खोब्रागडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल मेश्राम यांनी केले. संचालन डॉ. इंद्रकला बोपचे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वशिष्ठ खोब्रागडे यांनी मानले. मदतीचा हात देणारे दानशूर सहकारी या उपक्रमासाठी वशिष्ठ खोब्रागडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आर्थिक मदत करणाऱ्या दानशूर व्यक्ती पुढीलप्रमाणे : राजकुमार हिवारे, प्राचार्य, डायट गोंदिया, रमेश राऊत सर, यवतमाळ,. डॉ. नरेश वैद्य सर, ज्येष्ठ अधिव्याख्याता.), डायट गोंदिया, प्रणिता कापसे (उपशिक्षणाधिकारी), सारिका पवार मॅडम (अधिव्याख्याता), शिक्षिका योगिता संजय वानखेडे-ढोरे, बिश्वजित मंडल, चंद्रपूर, योगेश देवलकर, चंद्रपूर, उमेश भरणे वि.सा.व्य, देवरी, शिवकरण गोसावी, वि.सा.व्य., सोलापूर, सचिन राऊत , प्रकाश ब्राम्हणकर आमगाव, दमयंती चकोले-लांजेवार, सतीश बावणकर गोरेगाव, कु. स्मृती बन्सोड, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ममता येडे-पटले, गोंदिया, वि.सा.व्य सुनील राऊत, सडक-अर्जुनी, संतोष कुंभारे, कोल्हापूर, सुरेखा चवरे-गावडे, करमाळा, वाय. सी. भोयर, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी, आमगाव, संदीप मेश्राम, कातुर्ली, वि.सा.व्य. वशिष्ठ खोब्रागडे, सुनील बोपचे, रविशंकर पटले, ब्रजेश मिश्रा, सविता ताई यांच्याकडे जमा केलेले दीपा बिसेन, धनपाल कावळे, एल. यु. खोब्रागडे, रामेश्वर बागडे सर, धनंजय शेंडे (म.पो.), अमोल भगत, डायट, वि.सा.व्य. रामू शेंद्रे, शिक्षिका सारिका मडावी, उर्मिला वैद्य-मळामे (वि.सा.व्य डायट), मलेश मदनूरे (देवरी), दीपरेखा तूरकर (स्टाफ नर्स नागपूर), शिक्षक नारायण बुधवंत, मनिषा व योगेश जगणे, ओ. एस. बिसेन, (सेनिकेंप्र ), शितल कुकडे, संतोष डोंगरे, सेवानिवृत्त शिक्षक, गोंदिया, उषा आगाशे(अंगणवाडी पर्यवेक्षिका), प्रशांत शहारे, (तिरखेडी), कुमुदिनी चवरे-घोडेस्वार (विसाव्य आमगाव), अनिता ठेंगडी (विसाव्य गोंदिया), दामोदरजी बडवाईक (गोंदिया), सुलभा एस. पाऊलझगडे (आमगाव), उमेश तरोणे(साक्रीटोला), प्रमोद खोब्रागडे(डायट गोंदिया), विसाव्य भास्कर बाहेकर, सुनिल ठाकूर, विजयकुमार लोथे, शंकर वलथरे, संजय मस्के, विलास मलवार (समग्र शिक्षा), शिक्षक चित्तरंजन पुस्तोडे (पिपरीया), जितेंद्रसिंह चौहान (सतोना, गोंदिया ), तसेच सर्व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणारे हितचिंतक.अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य, त्यांच्या मनातील आनंद आणि त्यांना मिळणारा मायेचा आधार हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती आहे. मदतीचा हात देणाऱ्या प्रत्येक दात्यामुळे माणुसकीचा हा दीप अधिक तेजाने प्रज्वलित झाला आहे.