Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'बेरार टाईम्स'च्या बातमीचा धमाका! DPDC बैठकीत 'हिरकणी कक्ष' घोटाळ्याचे जोरदार पडसाद; पालकमंत्री नाईक यांचे जिल्हास्तरीय चौकशीचे आदेश!

'बेरार टाईम्स'च्या बातमीचा धमाका! DPDC बैठकीत 'हिरकणी कक्ष' घोटाळ्याचे जोरदार पडसाद; पालकमंत्री नाईक यांचे जिल्हास्तरीय चौकशीचे आदेश!

गोंदिया: बेरार टाईम्सने अत्यंत धडाकेबाज पद्धतीने चव्हाट्यावर आणलेल्या गोंदिया जिल्ह्यातील 'हिरकणी कक्ष बांधकाम घोटाळ्या'चे पडसाद आज पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) बैठकीत जोरदार उमटले.

बेरार टाईम्सच्या त्या खळबळजनक बातमीची गंभीर दखल घेत लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली. सत्ताधारी असो वा विरोधी, सर्वच लोकप्रतिनिधींनी एका सुरात प्रशासनाला धारेवर धरत चौकशीची जोरदार मागणी लावून धरली.

आमदारांचा वाढता रोष आणि प्रकरणात झालेला भ्रष्टाचार पाहता, पालकमंत्री इंद्रनिल नाईक यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आता या संपूर्ण घोटाळ्याची पोलखोल करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून ती सखोल चौकशी करणार आहे.महिला व बालकांच्या सुविधेसाठी उभारण्यात येणाऱ्या 'हिरकणी कक्षाच्या' बांधकामात मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे वृत्त 'बेरार टाईम्स'ने प्रसिद्ध केले होते. या बातमीमुळे प्रशासकीय वर्तुळात आधीच खळबळ उडाली होती.आज झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत या विषयावर चर्चा सुरू होताच लोकप्रतिनिधी अत्यंत आक्रमक झाले.https://www.berartimes.com/vidarbha/232571/

  • एकमुखाने प्रशासनाला विचारला जाब:खासदार राजेंद्र जैन, आमदार परिणय फुके, आमदार अभिजित वंजारी, आमदार राजकुमार बडोले, आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम आणि जि. प. अध्यक्ष लायराम भेंडारकर या सर्वच प्रमुख लोकप्रतिनिधींनी हिरकणी कक्ष घोटाळ्यावरून प्रशासनाला जोरदार धारेवर धरले.

  • अधिकाऱ्यांच्या मिलीभगतचा आरोप: हिरकणी कक्षाच्या नावाखाली शासनाचा निधी हडपणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी का घातले जात आहे? असा सवाल करत सर्वच नेत्यांनी सभागृहात अधिकाऱ्यांच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.

  • पालकमंत्री इंद्रनिल नाईक यांचे कडक निर्देश: लोकप्रतिनिधींचा आक्रमक पवित्रा पाहून पालकमंत्री इंद्रनिल नाईक यांनी प्रशासनाला तातडीने चौकशीचे निर्देश दिले. या प्रकरणात कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे सांगत त्यांनी जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.https://www.berartimes.com/maharashtra/231623/

भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले!

बेरार टाईम्सने केलेल्या दणकेबाज पाठपुराव्यामुळे आणि खासदार राजेंद्र जैन, आमदार परिणय फुके, अभिजित वंजारी, राजकुमार बडोले, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम तसेच जि. प. अध्यक्ष लायराम भेंडारकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. महिलांच्या सुविधेसाठी असलेल्या योजनेत डबाडबी करणाऱ्यांवर आता ही जिल्हास्तरीय चौकशी समिती काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

'बेरार टाईम्स'चा शब्द: चौकशी समिती काय अहवाल सादर करते आणि भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कधी कोसळते, यावर बेरार टाईम्सची घारीसारखी नजर कायम राहील!https://www.berartimes.com/maharashtra/232295/

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES