Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डाॅ.पटलेंच्या एक वर्ष पदपूर्तीतून आरोग्य विभागात जिल्ह्याचे नावलौकिक

डाॅ.पटलेंच्या एक वर्ष पदपूर्तीतून आरोग्य विभागात जिल्ह्याचे नावलौकिक

रोग्य सेवा ही केवळ नोकरी नसून समाजसेवेचे एक प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून हजारो रुग्णांच्या जीवनात आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकासंह प्रशासकीय यंत्रणेत आशेचा किरण निर्माण करणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक पदावरील यशस्वी कार्यकाळाचा एक यशस्वी टप्पा आज(दि.०९) पूर्ण केला आहे.

सामाजिक जाणीव आणि कष्टाची संस्कृती रुजलेल्या स्वभाव गुणांचे डॉ. पी. के. पटले हे जिल्ह्याच्या मातीतच जन्मले आहेत. तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा या छोट्याशा गावातून जीवनाचा प्रवास सुरू करणारे डॉ. पुरुषोत्तम पटले हे आज जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सरकारी आरोग्य सेवेत प्रवेश करताना केवळ करिअर नव्हे, तर समाजसेवेचे ध्येय स्विकारले. आरोग्य विभागातील विविध पदांवर काम करताना त्यांनी ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य समस्यांचा जवळून अभ्यास केला. रुग्णसेवा, शिस्तबद्ध प्रशासन आणि कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्याची त्यांची कार्यशैली त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते, जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक गतिमान झाली. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, मातृ-मृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यासाठीचे प्रयत्न, रुग्णालयातील सुविधांचा विस्तार, आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता आणि रुग्णांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले. सन २००१ पासून वैद्यकीय सेवेत प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच डॉ. पटले यांनी माणुसकीचा धागा कधीही तुटू दिला नाही. त्यांच्या दालनाचे दरवाजे सामान्य नागरिकांसाठी नेहमी खुले राहिले. रुग्णांच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची त्यांची कार्यपद्धती अनेकांच्या मनात विश्वास निर्माण करणारी ठरली आहे.
त्यांनी आपल्या १ वर्षाच्या कार्यकाळात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमातर्गंत सन २०२५-२६ एकूण ४१ ह्दय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया ५०० करण्यात आल्या.तसेच सर्वात महागड्या असलेल्या चहिरेपणा शस्त्रक्रिया केल्या.ग्रामीण रुग्णालय, देवरी येथे डायलिसीस युनिट पीपीपी कार्यक्रमांतर्गत सुरु करुन १६३९ रुग्णांना डायलिसीची सेवा देण्यात आलेली आहे.ग्रामीण रुग्णालय देवरी व अर्जुनी मोरगाव तसेच उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा येथे रक्त साठवणुक कक्ष सुरु करण्यात आले.सर्व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णलय तिरोडा येथे एक्सरे मशिन सेवा सेंटर व ई.शि.जी. सेवा त्यांच्या कार्यकाळात सुरु करुन ग्रामीण भागातील रुग्णांना एक चांगली सेवा त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळात उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रात गोंदिया जिल्हा हा ऑयबाल कलैक्शन सेंटर हे प्रथम क्रमाकावर आणण्याकरीता सर्वांच्या सहकार्याने केलेल्या प्रयत्नामुळे आरोग्य विभागात जिल्ह्याला नावलौकिक मिळाले आहे.
आज जिल्हा शल्य चिकित्सक पदावरील डाॅ.पी.के.पटले यांच्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण होत असताना, हा केवळ पदपूर्तीचा क्षण नाहीः तर आरोग्य सेवेतील निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणातून जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देणारा गौरवाचा कार्यकाळ ठरला आहे. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, अधिक संवेदनशील आणि अधिक लोकाभिमुख बनविण्यात डाॅ.पटले यांचा प्रवास आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES