
गोंदिया,दि.३० :गोंदिया शिक्षण संस्था द्वारे संचालित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदिया येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ११७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन व प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पटले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्यानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली. त्यानंतर प्राध्यापकवर्ग, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ. मनोज पाटले यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या निस्वाथ सेवा, अध्याित्मक विचारसंपदा व समाजप्रबोधनाच्या कार्यावर प्रकाश टाकला.
प्राध्यापकांनीही आपले विचार व्यक्त करताना राष्ट्रसंतांचे संतत्व, समाजसुधारक म्हणून केलेले योगदान अधोरेखित केले. याप्रसंगी राष्ट्रसंतांच्या शिकवणीवर आधारित 'या भारतात बंधुभाव नत्य वसु दे' या विद्यापीठ गीताचे सामूहिक रित्या गायन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन दिवस स्मरण समितीच्या समन्वयिका डॉ. स्नेहा जायसवाल यांनी केले. सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्था यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

