Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डोंगरगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

डोंगरगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गोंदिया,दि.२४-दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन' म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, आरोग्य, कल्याण आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल समाजात जाणिव निर्माण करणे हेच ह्या दिवसाचे उद्दिष्ट असते.प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला अंतर्गत आयुर्वेदीक दवाखाना डोंगरगाव दि.21 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य, योग व जीवनशैली मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, गोंदिया, आरोग्य विभाग जिल्हा परिषद गोंदिया आणि आई देवमोगरा महिला मंडळ देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, योग, मानसिक आरोग्य तसेच जीवनशैली व आहार मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सविता ताई पुराम,देवरी पंचायत समिती सदस्य वैशालीताई पंधरे,ग्राम डोंगरगावचे सरपंच सुरेंद्रजी परतेती यांच्या उपस्थितीत आयुर्वेदीक दवाखाना डोंगरगाव येथे 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने कार्यक्षेत्रातील ८० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहीती तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजाता ताराम यांनी दिली आहे. शिबीराप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचे रक्तदाब, रक्तातील साखर आणि वजन व बीएमआय तपासणी सोबत नियमित योगाभ्यास, मानसिक आरोग्य, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबीराप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजाता ताराम,आरोग्य सेविका सिमा झलके व माधुरी वैद्य,आरोग्य सेवक संतोष मोरे व गणेश नागरे,अंशकालीन स्त्री परिचर हेमलता यटेरे व योग शिक्षिका अनिता तुप्पट यांनी आरोग्य सेवा प्रदान केली.

शिबीरा दरम्यान समाज कल्याण गोंदिया तालुका समन्वयक निवास शहारे,आई देवमोगरा महिला मंडळ संस्थेचे प्रतिनिधी सुभाष एकनाथ चौधरी आणि कार्यकारी अध्यक्ष कमलेश चौधरी यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना योग व व्यायामाची सवय लागावी, मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच योग्य आहार व जीवनशैलीचा अवलंब करता यावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES