Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोवंश अवयव प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करा

गोवंश अवयव प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करा

गोरेगाव : शहरातील घोटी येथील तलावात गोवंशाचे अवयव आढळून आल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हिंदू समाजबांधवांतून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच सकल हिंदू समाज व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.निवेदनात,तलाव परिसरात आढळून आलेल्या गोवंशाच्या अवयवांमुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, या घटनेमागील जबाबदार व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन संबंधित घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे, घटनेमागील सूत्रधारांचा शोध घ्यावा तसेच कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच अशा घटनांमुळे सामाजिक सलोखा व शांतता बिघडू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे नमूद आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES