
गोरेगांव,दि.३१ः-तालुक्यातील मोहगांव (बु.) येथील परशुराम विद्यालय येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (संलग्न आयटक) च्या जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख कार्यकर्त्याचा शिक्षण शिबीर पार पडले.सर्वप्रथम शिबिराचे उदघाट्न चत्रूघन लांजेवार यांचे अध्यक्षतेत आयटक चे केंद्रीय शिक्षण विभागाचे सदस्य प्रा.डॉ.युगल रायलू(नागपूर ), राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष कॉ.
मिलिंद गणवीर यांचे हस्ते शहीद भगतसिंग यांचे तैलचित्राला माल्यार्पण करुण कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रामुख्याने संघटनेचे जिल्हा सचिव रवींद्र किटे, कार्याध्यक्ष महेंद्र कटरे, कोषाध्यक्ष महेंद्र भोयर,संघटन सचिव विष्णू हत्तीमारे,ईश्वरदास भंडारी, विनोद शहारे आशिष उरकुडे,दीप्ती राणे, सुनंदा दहिकर, संगीता गावड, देवेश्री कोरे, दिपाली गौतम प्रामुख्याने हजर होते. मिलिंद गणवीर यांनी या शिबिराचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सहसचिव व शिबिराचे संयोजक बुधराम बोपचे यांनी केले.महाराष्ट्र राज्य उत्क्रष्ट शिक्षक पुरस्कार व राष्ट्रीय कर्मवीर पुरष्कार प्राप्त, बहुभाषी तसेच "मनुस्मृती बनाम संविधान "या पुस्तकाचे लेखक कॉ.
युगल रायलू यांनी "कामगार एकजूटता आणि संघर्ष "विज्ञान वादी विचार सरणी या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.कार्यक्रमात 55 शिबिरार्थी हजर होते,प्रश्नोत्तर सत्र पण विचार प्रेरक झाला. या शिबिराची व्यवस्था संघटनेच्या गोरेगाव तालुक्यातील तुळशीदास चौधरी, निलेश मस्के, मिथुन राहुलकर, जीवन मेश्राम, राजकुमार नेवारे, अरुण बोपचे, सोमेश्वर राऊत,छगन कुमळे, देवराज गावळ, पवन राऊत,सुनील उईके, मुन्नालाल कांबळे आदी कार्यकर्त्यानी केली. जिल्ह्यातील तालुक्याचे प्रमुख कार्यकर्ते देवेंद्र मेश्राम,खुशाल बनकर, मुकेश कापगते, देवेंद्र दुरुगकर, मुकेश बिसेन, श्याम कटरे,राजेश भोकासे, गणेश कांबडी, ऋषिपाल डोंगरे, इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले. कार्यक्रमाचे समारोप चत्रूघन लांजेवार व आभार बुधराम बोपचे यांनी मानले.

