Dailyhunt
ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप;सरपंचासह ९ जणांवर गुन्हा दाखल

ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप;सरपंचासह ९ जणांवर गुन्हा दाखल

लाखनी : लोकशाहीत कायद्याचे राज्य सर्वोच्च असताना, सावरी-मुरमाडी ग्रामपंचायत कार्यालयाला बेकायदेशीरपणे कुलूप ठोकून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे प्रकरण आता नऊ जणांना चांगलेच महागात पडले आहे.टविकास अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने दोषी ठरवल्यानंतर, लाखनी पोलिसांनी सरपंच सचिन भिकाराम बागडे (वय ४५) यांच्यासह मंगेश धांडे (वय ३६), मोहन रेहपाडे (वय ४५), आदित्य बागडे (वय ३२), सुरेखा चाचेरे (वय ४५), पुष्पा वंजारी (वय ५५), विनोद चाचेरे (वय ४८), संजय वंजारी (वय ५६) आणि विनोद चकोले (वय ४५) सर्व रा.

सावरी/मुरमाडी यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२१, १८९(२) व १२६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.काही दिवसांपूर्वी याच प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय चौकशीचा अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी वेगाने हालचाली केल्या. ग्रामपंचायत अधिकारी संगीता वसंत मारवाडे (४१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९:३५ वाजताच्या सुमारास आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बळजबरीने बाहेर काढले होते. त्यानंतर कार्यालयाला कुलूप लावून शासकीय कामकाज बंद पाडले होते. गटविकास अधिकारी, पंचायत समिती लाखनी यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय समितीने या घटनेची सखोल चौकशी केली. या चौकशीत आरोपींनी केलेले कृत्य सिद्ध झाल्याचा निष्कर्ष निघताच पोलीस कारवाईचे आदेश देण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES