Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जि.प.निबंध स्पर्धेतील बक्षिसाचा धनादेश बाउन्स

जि.प.निबंध स्पर्धेतील बक्षिसाचा धनादेश बाउन्स

तिरोडा, ता. ३: गोंदिया जिल्हा परिषदेमार्फत आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थिनीला देण्यात आलेला बक्षिसाचा धनादेश बाउन्स झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तालुक्यातील बिहीरीया येथील यशस्वी शेंडे हिने तालुका व जिल्हास्तरावर अव्वल येत उल्लेखनीय यश संपादन केले होते. मात्र, तिच्या कष्टाचे फळ ठरणारा दहा हजार रुपयांचा धनादेश बँकेत जमा केल्यानंतर अनादरित झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शैक्षणिक स्पर्धा या केवळ गुणांची चाचणी नसतात, तर त्या विद्याथ्यांच्या आत्मविश्वासाचा पाया घालतात. ग्रामीण भागातील विद्याच्यर्थ्यांसाठी अशा स्पर्धा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची
संधी असते. तालुक्यातील विहीरीया येथील यशस्वी शेंडे हिने तालुका आणि जिल्हा या दोन्ही स्तरांवर प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. तिच्या या यशाचे औचित्य साधून तिला देण्यात आलेला दहा हजार रुपयांचा धनादेश हा तिव्यासाठी केवळ आर्थिक मदत नव्हता, तर तिच्या परिश्रमांची अधिकृत दखल होती. परंतु, हाच घनादेश बँकेत अनादरित ठरतो, तेव्हा तो केवळ कागदाचा तुकडा राहात नाही; तो व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरचा डाग ठरतो. प्रश्न उस्सा निर्माण होतो की, ही केवळ तांत्रिक चूक आहे का, की व्यवस्थात्मक बेपर्वाईचे लक्षण० धनादेश जारी करताना आवश्यक आर्थिक तरतूद, खात्याची स्थिती किंवा प्रशासकीय पडताळणी या मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष कसे झाले.
जिल्हा परिषदेला अनेकदा 'मिनी मंत्रालय' असे संबोधले जाते. या संस्थेकडून स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व अपेक्षित असते. मात्र, अशा प्रकारच्या घटना घडल्यास या प्रतिमेलाच तडा जातो. शासनाच्या योजनांबाबत नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने केवळ योजना राबवणे पुरेसे नसते, तर त्या काटेकोरपणे आणि
जबाबदारीने अंमलात आणणेही तेवढेच आवश्यक असते. या घटनेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक परिणाम. याहूनही गंभीर बाब म्हणजे, अशा घटनांनंतर अनेकदा जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया धूसर राहते. दोष नेमका कुणाचा, याची स्पष्टता नसल्यास अशा चुका पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे ठरते.

माझ्या मुलीने खूप मेहनत घेऊन तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवता, याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, तिला मिळालेला बक्षिसाचा धनादेश बाउन्स झाल्याने आम्ही निराश झालो आहोत. जिल्हा परिषदेसारख्या संस्थेकडून अशी चूक होणे खेदजनक आहे. संबंधित अधिकान्यांनी तातडीने दखल घेऊन रक्कम द्यावी व जबाबदारांवर कारवाई करावी. - प्रभातकुमार शेंडे, मुलीचे वडील, बिहिरीया

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES