Dailyhunt
काचेवाणी येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम लवकरच

काचेवाणी येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम लवकरच

तिरोडा,दि.६-- तिरोडा-गोंदिया मार्गावरील काचेवाणी येथील रेल्वे ओव्हरब्रिजचे काम मंजूर झालेले असतानाही काही तांत्रिक अडचणींमुळे सदर काम प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभाग, नागपूर येथील कार्यकारी अभियंता संजीव जगताप यांची आ.

विजय रहांगडाले यांनी भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी काचेवाणी रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामास गती देऊन तातडीने अडचणी दूर करून काम मार्गी लावण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी हा ओव्हरब्रिज अत्यंत महत्त्वाचा असल्याने कामात विलंब होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही त्वरित पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. तसेच अदानी गेट क्रमांक १ ते मुंडीपार या रस्त्याच्या कामाचा आढावाही घेण्यात आला. या रस्त्याच्या दुरुस्ती व सुधारणा कामांना गती देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES