Dailyhunt
केशोरी येथे 6 खोल्यांच्या घराला आग,१२ लाखाचे नुकसान

केशोरी येथे 6 खोल्यांच्या घराला आग,१२ लाखाचे नुकसान

अर्जुनी-मोर.,दि.०४ः- गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी च्या पंढरीनगर येथे आज सकाळी सुमारे 10 ते 10:30 वाजताच्या दरम्यान एका घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार सदाशीव शिवराम मडावी रा.पंढरीनगर/केशोरी यांच्या घराला अचानक पणे आग लागली.आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किट किंवा इतर कारणाची शक्यता वर्तवली जात आहे.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी,केशोरी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत अर्जुनी नगरपंचायत ची अग्निशमन ची गाडी बोलावुन पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.मात्र आगीत संपूर्ण घर जळून खाक झाला.यात रोकड व दागिने,इलेक्ट्रानीक वस्तु,धान्यसाठा,तांदूळ,भांडी,कपडे,खिडक्या-दरवाजे,झोपण्याचे पलंग,लाकडी छत व इतर फर्नीचर साहित्य पूर्णतः जळाले.या आगीत अंदाजे 11 लाख 87 हजारांचे नुकसान झाल्याची माहिती मंडळ अधिकारी पुंडलिक कुंभरे व ग्राम महसूल अधिकारी देवेंद्र बोरकर यांनी तहसीलदारांना प्रतिवेदन द्वारे दिली आहे.दरम्यान प्रशासनाने नुकसानग्रस्त निराधार व बेघर झालेल्या कुटुंबाला तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES