Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खा. प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका

खा. प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका

युवा व स्थानिक नेत्यांचा राष्ट्रवादीच्या धोरणांवर विश्वास; पक्षसंघटन होणार अधिक मजबूत

गोंदिया,दि.२२:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशक विकासवादी धोरणांवर आणि जनहिताच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त करत गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव व सालेकसा तालुक्यातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, तरुण आणि कार्यकर्त्यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

या धडाकेबाज पक्षप्रवेशामुळे गोंदिया जिल्ह्यात पक्षाचे संघटन अधिक मजबूत होऊन कार्याला नवी ऊर्जा मिळणार आहे.

या सोहळ्यात तिरोडा तालुक्यातील माजी मुख्याध्यापक विकास कडू भांडारकर, पांजराचे माजी उपसरपंच भाऊराव टीकाराम बावनकर, अरविंद शालिकराम चामट, शुभम प्रकाश भांडारकर व माडगी येथील एकता रोडणे तसेच गोंदिया तालुक्यातील चारगावचे उपसरपंच संतोष शेडे यांनी पक्षात प्रवेश केला.

याशिवाय लक्की पवार, विक्की ठाकरे, नैतिक जैतवार, आयुष चौहान, हनु फाल्के, अनमोल नेताम, कुणाल लिल्हारे, निखिल लिल्हारे, शिवम् लिल्हारे, भुसन उके, चैतन्य तुरकर, पियूष ठाकरे, शौर्य राठोड, अविनाश तिड़के, स्मित वरोड, रेहान कुरैसी, देवेन मेश्राम, दुर्गेश भोयर, सचिन मानकर, प्रतिक बाबा, प्रियांशु मेश्राम, सक्षम टेंभरे, सक्षम गौतम, विकाश बुरले, बॉबी, आदित्य दमाहे, शिरीष दमाहे, देवांश जगने, मोहित बम्भारे, सत्यम तुरकर, श्रेयश राऊत, वेद कटकवार, आर्यन साठवणे, अभिषेक शर्मा, वंश राहंगडाले, निखिल बिसेन, प्रियांशु गौतम, मोहित शेंडे, ऋषभ वनिया, मयंक लिल्हारे, अनमोल राउत, वेक्टर सोनी, पुरवेश शेंडे, भुवन शहारे, शाहिल शेख, राम बनोटे, राजेश पटले, मयूर बिसेन, उज्जवल पटेल, जय नारनवरे, प्रज्वल शेंडे, क्षितिज इंगळे, रिशप विनय, सम्यक रामटेके, रोहित जाधव, अलफैझ सैय्यद, अमर शेख, रेहान बेग, विनायक टेकाम, ऊझफ शेख, तुसार उके, अजिल खान, राज खापे, हर्ष सिलापे, तोहीद पठाण, प्रज्वल नागरीकर, सॅम पटेल, गौरव बारीकर, शिव कापसे, ठाकरे जी यांच्यासह अर्जुनी मोरगाव तालुक्यातील श्री. इंद्रराज झिलपे आणि सालेकसा तालुक्यातील श्री. आकाश बावनकर यांच्यासह मोठ्या संख्येने युवकांनी राष्ट्रवादीचा गमछा परिधान केला.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती:

या सोहळ्यास खासदार राजेंद्र जैन,प्रेमकुमार रहांगडाले, सौ. राजलक्ष्मी तुरकर,केतन तुरकर, जगदीश बावनथडे,नानू मुदलियार,किशोर तरोने,भोजराम रहिले,लोकपाल गहाणे,नागो बनसोड,योगेश नाकाडे,पाशा शेख, डॉ. अजय उमाटे, ब्रजभूषण बैस,बाजीराव तरोने,हिरालाल साठवणे, विजय रहांगडाले यांच्यासह पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES