
गोंदिया,दि.०५- शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार हा मुद्दा नवीन राहीला नसून ज्या विभागातून वर्षभराचे जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन केले जाते,त्या नियोजन विभागाच्या टक्केवारीच्या भूमिकेमुळे मात्र शासकीय भ्रष्टाचाराला पुष्टी जोडली गेली ती गोंदिया ग्रामीण पोलिसांकडे कंत्राटदारांनी सादर केलेल्या त्या पत्रामुळेच.त्यानंतर टक्केवारी आणि भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याची अनुभूती येते.त्यातच या प्रकरणामुळे विद्यमान जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर हे रजेवर गेल्याने गेल्या एक आठवड्यापासून हे पद रिक्त झाले आहे.त्यातच आधी याच खुर्चीवर राहिलेले आणि सद्या जिल्हा सांख्यिंकी विभागाचे प्रमुख असलेले धोंगडे यांनी पुन्हा जिल्हा नियोजन विभागातील जिल्हा नियोजन अधिकारी या पदावर आपणास नियुक्ती मिळावी याकरिता पालमंत्र्यासह इतर राजकीय नेत्यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केल्याची चर्चा सुरु झाली आहे.विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षापुर्वी गोंदिया जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयामार्फेत ज्या काही क्रिडा साहित्य वाटप व खेळांडु विद्यार्थ्यांकरीता प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात झालेला घोळ उघडकील आलेला होता,त्या काळात श्री.धोंगडे हेच जिल्हा नियोजन अधिकारी असल्याची चर्चा आहे.त्यातील जिल्हा क्रिडा विभागाच्या काही प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयापंर्यत तक्रार झाली असून उपविभागीय अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणूनही नेमल्याची माहिती समोर आली आहे.अशा काळात पुन्हा त्यांच्याकडे जर जिल्हा नियोजन विभागाचा पदभार गेल्यास आधीच्या सुरु असलेल्या चौकशीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अनेकांचे म्हणने आहे.

