Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पिंपळगाव/ खांबी येथील अर्णव डोंगरवार शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात अव्वल- जि. प.अध्यक्षांचे हस्ते सत्कार

पिंपळगाव/ खांबी येथील अर्णव डोंगरवार शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात अव्वल- जि. प.अध्यक्षांचे हस्ते सत्कार

अर्जुनी-मोर.,दिनांक ५ जुलै-नुकत्याच जाहीर झालेल्या वर्ग 5 च्या शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद वरिष्ठ शाळा पिंपळगाव खांबी केंद्र निमगाव,प.स अर्जुनी/मोर, येथील अर्णव चंद्रकांत डोंगरवार यांचे चिरंजीव अर्णव चंद्रकांत डोंगरवार याची 84% गुण घेऊन गोंदिया जिल्हयातून गुणवत्ता यादीत प्रथम स्थान पटकावले .त्याप्रीयर्थ लायकराम भेंडारकर अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया यांचे शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विलास फुंडे सरपंच ग्रामपंचायत पिंपळगाव /खांबी , निवृत्तीताई शेंडे उपसरपंच,समस्त ग्रामपंचायत पदाधिकारी, राजेंद्र राखडे, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, सौ .भूमेश्वरी ताई ब्राह्मणकर उपाध्यक्ष, मंगेश उके,मनोज कोरे ,राजु ब्राह्मणकर, शिल्पाताई ब्राह्मणकर, तनुजा रामटेके, वामन कुंभरे, पिंगळाताई फुंडे,रक्षाताई मेश्राम उत्तराता गजबे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,के .के .देशपांडे उच्च श्रेणी मुख्याध्यापक, चंद्रकांत डोंगरवार केंद्र प्रमुख निमगाव, नरेंद्र शहारे केंद्रप्रमुख बोळदे / करड , आर. एस. संग्रामे पदवीधर शिक्षक, यादोराव कापगते, चंद्रशेखर गभने, हंसराज खोब्रागडे, कुं.जयश्री बावीस्कर,सहाय्यक शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
विशेष बाब ही की सदर विद्यार्थ्याचे सैनिक विद्यालय सातारा येथे सुद्धा निवड झालेली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES