Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रंगकाम करणाऱ्या नराधमाचा 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

रंगकाम करणाऱ्या नराधमाचा 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

डचिरोली : गडचिरोलीच्या चामोर्शी शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराचे रंगकाम करणाऱ्या एका 25 वर्षीय युवकाने सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

याप्रकरणी आरोपीला चामोर्शी पोलिसांनी अटक केली असून प्रज्वल सदाशिव भांडेकर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेच्या राहत्या घरात सध्या रंगकामाचे काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे ही सात वर्षांची बालिका घराच्या गच्चीवर खेळत होती. यावेळी तिथे रंगकाम करत असलेल्या प्रज्वल याने आजूबाजूला कोणीही नसल्याची संधी साधली तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

घटनेनंतर पीडित बालिकेला शारीरिक त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांच्या मनात संशय आला. त्यांनी तात्काळ तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. वैद्यकीय अहवालात बालिकेवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट होताच कुटुंबीयांना धक्काच बसला. पीडितेच्या मातेने तक्रार नोंदवताच पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

या घटनेने बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.घराचे रंगकाम करण्यासाठी आलेल्या एका २५ वर्षीय नराधमाने अवघ्या ७ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणी चामोर्शी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला तात्काळ अटक केली आहे. प्रज्वल सदाशिव भांडेकर (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत असून बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहेमिळालेल्या माहितीनुसार, पीडित ७ वर्षीय बालिकेच्या राहत्या घरात सध्या रंगकामाचे काम सुरू आहे.

आरोपी प्रज्वल भांडेकर हा तिथे रंगकाम करणारा मजूर म्हणून काम करत होता. घटनेच्या दिवशी ही चिमुकली नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या गच्चीवर (टेरेस) खेळत होती. यावेळी गच्चीवर रंगकाम करत असलेल्या प्रज्वल याने आजूबाजूला कोणीही नसल्याची संधी साधली आणि चिमुकलीला गाठून तिच्यावर क्रूरपणे लैंगिक अत्याचार केला.या धक्कादायक घटनेनंतर पीडित चिमुकलीला प्रचंड शारीरिक त्रास होऊ लागला. मुलीची बदललेली प्रकृती आणि तिला होणारा त्रास पाहून कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

त्यांनी वेळ न घालवता चिमुकलीला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालात बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. हा अहवाल पाहताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. अहवाल समोर येताच पीडित बालिकेच्या आईने तात्काळ चामोर्शी पोलीस ठाणे गाठून नराधम प्रज्वल भांडेकर विरोधात रीतसर तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ पोक्सो आणि इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला. चामोर्शी पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी प्रज्वल सदाशिव भांडेकर याला बेड्या ठोकल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES