
तिरोडा,दि.०६ः- सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या गोंदिया जिल्ह्यातील डाकराम-सुकळी "राजमठ मंदिर" येथिल भव्य यात्रा महोत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या अंतर्गत धर्मसभा व भजन संध्या कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कविश्वर कुलाचार्य प.पू. श्री कारंजेकर बाबा उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणस्पर्शामुळे या भूमीला विशेष पवित्रता लाभली असून श्री क्षेत्र डाकराम-सुकळी हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहे. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी श्री प्रभूंच्या चरणी दंडवत घालून सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी लाभावी व दुःखांचे निवारण व्हावे, अशी प्रार्थना केली.
कार्यक्रमाला के.आर. शेंडे, प्रेमकुमार रहांगडाले, सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर, जगदीश बावनथडे, रजनीताई कुंभरे, सुनील मेश्राम, विजय बिंझाडे, आनंदराव गजभिये, चेतनाताई बावनथडे, ममता बैस, चैतलाल पटले, निताताई रहांगडाले, लताताई पुडके, परमानंद पारधी, संदीप कुर्वे, दुर्गेश कडपती, राजेश तुरकर, शामराव उइके, आशिष चौधरी, जगन धुर्वे, सिंधुताई हिरापुरे, पुष्पलता ताई गौतम, छायाताई टेकाम, टेम्भरे ताई, छायाताई धुर्वे आदींसह महानुभाव पंथाचे अनुयायी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव निर्माण इमारतीचे लोकार्पण
दरम्यान, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सुकडी/डाकराम येथे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत खासदार प्रफुल पटेल यांच्या पाठपुरावा व जिल्हा परिषद सदस्य जगदिश बावनथडे यांच्या प्रयत्नाने नव्याने बांधण्यात आलेल्या शालेय इमारतीचे लोकार्पण माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते संपन्न झाले.

