Dailyhunt
तिरोडाचा सुपुत्र गेंदलाल रहांगडाले यांना सीमा सुरक्षा दलात उपनिरीक्षक पदावर पदोन्नती

तिरोडाचा सुपुत्र गेंदलाल रहांगडाले यांना सीमा सुरक्षा दलात उपनिरीक्षक पदावर पदोन्नती

तिरोडा -तिरोडा गावच्या गेंदलाल नथुजी रहांगडाले, या शूर सुपुत्राने आपल्या कठोर परिश्रमाने, शिस्तीने आणि देशभक्तीने एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) उल्लेखनीय आणि समर्पित सेवा पूर्ण केल्यानंतर, त्याला नुकतीच उपनिरीक्षक (एसआय) पदावर पदोन्नती मिळाली आहे.

तो सध्या जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरच्या बांदीपोरा भागातील ६२ व्या बटालियनमध्ये कार्यरत आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत आणि आव्हानांमध्येही, त्याने नेहमीच अत्यंत निष्ठेने, धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले आहे.

त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण गावात अभिमान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे! आ. विजय रहांगडाले, सभापती तेजराम चव्हाण, जिल्हा महिला अध्यक्ष तुम्हेस्वरी बघेले सभापती जितेंद्र रहांगडाले, महिला व बाल कल्याण सभापती रजंनीताई कुंभारे, दलित मित्र विजय खोब्रागडे, तसेच गावकरी, मित्र आणि कुटुंबीयांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांना उज्ज्वल भविष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.ही उपलब्धी केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी आहे आणि भावी पिढ्यांनाही राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देत राहील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES