
नागपूर, दि. 6 एप्रिल 2026:केंद्राच्या 'इज ऑफ लिव्हिंग' निर्देशांकानुसार ग्राहक सेवा प्रदान करताना, महावितरणच्या नागपूर परिमंडलाने 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 66 हजार 422 लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोड दिले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात नागपूर परिमंडलात 'इज ऑफ लिव्हींग' या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीने सेवा दिल्या जात आहेत.यात मागिल वर्षभरात नागपूर शहर मंडलातील 38 हजार 766, नागपूर ग्रामीण मंडलातील 18 हजार 126 आणि वर्धा मंडलातील 9 हजार 530 लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या गेल्या आहेत.
यात नागपूर जिल्ह्यात 56 हजार 892 नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या, यात सर्वाधिक 11 हजार 801 वीज जोडण्या या कॉग्रेसनगर विभागात तर त्याखालोखाल मौदा विभागात 8 हजार 597, बुटीबोरी विभागात 7 हजार 482, महाल विभागात 7 हजार 262, सिव्हील लाईन्स विभागात 7 हजार 23, गांधीबाग विभागात 5 हजार 198, सावनेर विभागात 3 हजर 942, उमरेड विभागात 3 हजार 339 तर काटोल विभागात 2 हजार 248 वीज जोडण्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यात देण्यात आलेल्या 9 हजार 530 नवीन वीज जोडण्यांमध्ये सर्वाधिक 4 हजार 605 वीज जोडण्या वर्धा विभागात तर त्याखालोखाल हिंगणघाट विभागात 2 हजार 641 तर आर्वी विभागात 2 हजार 241 नवीन लघुदाब वीज जोदण्या देण्यात आल्या.
या 66 हजार 422 नवीन लघुदाब वीज जोडण्यांमध्ये सर्वाधिक 53 हजार 137 या घरगुती वीज जोडण्या असून यात नागपूर शहर मंडलातील 31 हजार 341, नागपूर ग्रामीण मंडलातील 14 हजार 840 तर वर्धा मंडलातील 6 हजात 958 वीज जोडण्यांचा समावेश आहे. याशिवाय परिमंडलात 9 हजार 635 वाणिज्यीक, 1 हजार 203 औद्योगिक आणि 2 हजार 447 इतर वीज जोडण्या देण्यात आल्या.
तात्काळ वीज जोड
'महावितरण'कडून 'इज ऑफ लिव्हिंग' अंतर्गत नागपूर परिमंडलात नवीन वीज जोडणीसाठी आवश्यक पायाभुत सुविधा उपलब्ध असलेल्या भागात मागेल त्यास ताबडतोब नवीन वीजजोड देण्यात येत आहे. 'महावितरणच्या 'इज ऑफ लिव्हिंग' चा लाभ घेत ग्राहकांनी देखील नवीन वीज जोडणी घेतल्यानंतर त्यांच्या वीज बिलांचा भरणा ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमाने नियमित करुन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
लघुदाब ग्राहकांनावर्षभरात दिलेल्या नवीन वीज जोडण्यांचा तपशील
| मंडल | घरगुती | वाणीज्यीक | औद्योगिक | इतर | एकूण |
| नागपूर ग्रामीण मंडल | 14840 | 1936 | 437 | 913 | 18126 |
| नागपूर शहर मंडल | 31339 | 5906 | 520 | 1001 | 38766 |
| वर्धा मंडल | 6958 | 1793 | 246 | 533 | 9530 |
| नागपूर परिमंडल | 53137 | 9635 | 1203 | 2447 | 66422 |

