Saturday, 18 Jan, 3.29 pm बोभाटा

होम
जगातील सर्वात लांबलचक केक तयार करून भारताने चीनचा रेकॉर्ड मोडला !!

नुकतंच आणखी एक रेकॉर्ड भारताच्या नावावर झाला आहे. हे रेकॉर्ड जगातील सर्वात लांबलचक केकचा आहे. केरळमधील जवळजवळ सर्व बेकर्स आणि शेफ्सनी एकत्र येऊन तब्बल ६.५ किलोमीटर लांब केक तयार केला आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने ट्विट केलेला हा व्हिडीओ पाहा.

बेकर्स असोसिएशन केरळने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा रेकॉर्ड बनवण्यात आला आहे. या वॅनिला केकची रुंदी ४ इंच, तर वजन तब्बल २७०० किलो एवढं आहे. केरळच्या १५०० बेकर्स आणि शेफ्सने मिळून हा केक तयार केला आहे. केक पूर्ण करण्यासाठी त्यांना तब्बल ४ तासांचा वेळ लागला. यासाठी १२०० किलो साखर आणि पीठ वापरण्यात आलं आहे.

केरळच्या शेफ्सना चीनच्या फ्रुटकेकचा रेकॉर्ड मोडायचा होता. चीनी शेफ्सनी बनवलेला केक हा ३.२ किलोमीटर लांब होता. भारताने हे रेकॉर्ड जवळजवळ दुप्पट लांबीचा केक तयार करून मोडला आहे.

तब्बल ३२०० किलो वांग्याचं भरीत? पाहा रेकॉर्ड केलंय कोणत्या मराठमोळ्या वाघानं...

बोभाटा.कॉम
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Bobhata
Top