Wednesday, 22 Jan, 11.39 am बोभाटा

होम
पुणेकरांनो, २ लाख फुलांचे प्रकार, वेगवेगळी झाडे, बोन्साय आणि रोझ शो असलेला फुलोत्सव आलाय

एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन हे पुण्याच्या गजबजलेल्या भागाच्या मधोमध असलेलं नंदनवन आहे. पश्चिम भारत कृषी संस्थेकडून एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये दरवर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीस फुलोत्सव भारावला जातो. हा फुलोत्सव ३ दिवसांचा असतो, पण यावर्षी फुलोत्सव १० दिवस असणार आहे. या फुलोत्सवात काय खास आहे, काय नवीन पाहता येईल ? चला जाणून घेऊ.

मंडळी, हा फुलांचा उत्सव आहे. अनेक प्रकारची फुले या प्रदर्शनात दाखवली जातात. एक आकडाच सांगायचा झाला तर फुलांचे जवळजवळ २ लाख प्रकार इथे पाहायला मिळतील. याखेरीज ३० वेगळ्या प्रकारची झाडेही असतील. फुलोत्सवचं मुख्य आकर्षण हे बोन्साय झाडं असतात. शिवाय 'रोझ शो' प्रसिद्ध आहे.

हे फक्त प्रदर्शन नाही. तुम्ही रोपटी विकतही घेऊ शकता. ही झाडे देशाच्या वेगवेगळ्या भागातील असणार आहेत. हे सर्व पाहताना तुम्हाला जर भूक लागली तर खवय्यांसाठी १० फूड स्टॉल असणार आहेत. प्रदर्शनाशिवाय फुलांच्या सजावटी, चित्रकलेच्या स्पर्धाही घेण्यात येणार आहे. प्रत्येकी ५० रुपये दराने तुम्हाला हे प्रदर्शन पाहता येईल. मग कधी जाताय फुलोत्सावात ?

पत्ता : एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन, रेस कोर्स, पुणे.
तारीख : १७ जानेवारी २०२० ते २६ जानेवारी २०२०.
वेळ : दुपारी १ ते ४

बोभाटा.कॉम
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Bobhata
Top