Wednesday, 22 Jan, 5.31 pm बोभाटा

होम
या गोष्टीसाठी हॉटेलने आकारले २७ रुपये? तुम्हाला पटतंय का?

बरेचदा हॉटेलचं बिल बघून लोकांना धक्का बसतो. राहुल बोसला ३ केळ्यांसाठी ४४२ रुपये मोजायला लागले होते ती बातमी तर तुम्हाला माहित असेलच. पण आज आम्ही ज्या बिलचा किस्सा सांगणार आहोत तशा प्रकारचं बिल तुम्ही नक्कीच कधी पाहिलं नसणार.

अमेरिकेतील कोलरॅडो येथील 'टॉम्स डिनर' नावाच्या हॉटेलमध्ये एक माणूस गेला होता. जेवून झाल्यावर त्याला जे बिल आलं त्यात एक रक्कम चक्क त्याच्या मूर्ख प्रश्नांसाठी आकारण्यात आली होती. हा पाहा फोटो.

हा फोटो रेडीटवर शेअर करण्यात आला होता. ग्राहकाच्या मूर्ख प्रश्नांसाठी हॉटेलने चक्क ०.३८ डॉलर्स म्हणजे २७ रुपये आकारले आहेत. हे पैसे काही त्यांनी अचानक आकारलेले नाहीत. टॉम्स डिनर हॉटेलच्या मेन्यूकार्डवर स्पष्टपणे मूर्ख प्रश्नांसाठी ०.३८ डॉलर्स आकारले जातील असं छापलेलं आहे. हा नियम गेल्या २० वर्षांपासून आहे.

मंडळी, भारतातील हॉटेलमध्ये असा नियम आणला तर तुम्हाला पटेल का? तुमचं मत नक्की द्या!!

बोभाटा.कॉम
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Bobhata
Top