Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अहिल्यानगर : कोपरगाव पंचक्रोशीची सहकारमहर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्यामुळे प्रगती - तुळशीराम कानवडे

अहिल्यानगर : कोपरगाव पंचक्रोशीची सहकारमहर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्यामुळे प्रगती - तुळशीराम कानवडे

हिल्यानगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यातील लेखा शाखेचे गणेश वाबळे, अण्णासाहेब मोरे व रासायनिक विभागाचे माधवराव कासार, अर्जुन शिलेदार यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे उपस्थित होते. माजी मंत्री दिवंगत शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण अर्थकारणाबरोबरच शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध केले. त्यांनी साखर कारखाना व उपपदार्थ, प्रकल्पांची यशस्वी उभारणी केली. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, युवाध्यक्ष आमदार विवेक कोल्हे यांनी कारखान्याच्या प्रगतीत भर घातली आहे. कामगार, कारखान्याचे व्यवस्थापनामुळे कोपरगाव पंचक्रोशीची प्रगती झाली, असे मत प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी व्यक्त केले.

यावेळी सेवानिवृत्त कामगारांनी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे दूरदृष्टीचे नेतृत्व होते. संजीवनी उद्योग समूहात काम करताना अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या अशा भावना व्यक्त केल्या. आमदार विवेक कोल्हे यांनी आधुनिकीकरणाची कास धरत बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत कारखान्याच्या प्रत्येक विभागाचे संगणकीकरण करत काळानुरूप बदल केले आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी संजीवनी समुहाच्या प्रगतीची माहिती दिली. सहायक उपमुख्य लेखापाल प्रवीण टेमगर यांनी प्रास्ताविक केले. देवराम देवकर व चंद्रकांत जाधव यांनी स्वागत केले. रावसाहेब होन यांनी आभार मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ChiniMandi Marathi