Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'भारती शुगर' पलूस-तासगावच्या विकासाचा दुवा: आ. विश्वजित कदम

'भारती शुगर' पलूस-तासगावच्या विकासाचा दुवा: आ. विश्वजित कदम

सांगली : भारती एनर्जी अँड शुगर कारखाना हा पलूस आणि तासगाव तालुक्याच्या विकासाचा महत्त्वपूर्ण दुवा ठरत आहे, असे मत माजी मंत्री तथा आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.भिलवडी येथे भारती एनर्जी अँड शुगर, तुरची कारखान्याच्या शेती विभागाच्या भिलवडी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ते बोलत होते.

आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर भारती कारखान्याने आवश्यक तयारी पूर्ण केली असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या नोंदी घेण्यासाठी भिलवडी येथील उत्तर भाग विकास सोसायटीच्या इमारतीत हे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे.या उद्घाटनप्रसंगी खासदार विशाल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऋषिकेश लाड आणि आमदार रोहित पाटील उपस्थित होते. चितळे उद्योग समूहाचे मकरंद चितळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.

यावेळी उत्तर भाग विकास सोसायटीचे चेअरमन रमेश पाटील, भारती एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील, प्रभारी शेती अधिकारी रोहित साळुंखे, सचिन पाटील, सुनील गायकवाड यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, पदाधिकारी आणि परिसरातील मान्यवर उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विभागीय कार्यालय सुरू करण्यात आल्याने आगामी गळीत हंगामाच्या तयारीला अधिक गती मिळणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून परिसरातील ऊस उत्पादकांशी अधिक समन्वय साधण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ChiniMandi Marathi