Dailyhunt
दुग्ध व्यवसायात 'एआय' क्रांती : फाइंडॅबिलिटी सायन्सेसतर्फे दुग्ध व्यवसायासाठी विशेष 'लॅक्टाएआय' प्लॅटफॉर्म लाँच

दुग्ध व्यवसायात 'एआय' क्रांती : फाइंडॅबिलिटी सायन्सेसतर्फे दुग्ध व्यवसायासाठी विशेष 'लॅक्टाएआय' प्लॅटफॉर्म लाँच

ChiniMandi Marathi 2 weeks ago

मुंबई : 'सॉफ्टबँक'चे पाठबळ असलेल्या 'फाइंडॅबिलिटी सायन्सेस' या एंटरप्राइझ एआय कंपनीने डेअरी आणि 'व्हे' प्रक्रिया केंद्रांसाठी विशेषतः तयार केलेले लॅक्टाएआय ('LactaAI') हे इंडस्ट्रियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म लाँच केले.

प्लांटचे स्वरूप आणि उत्पादनांच्या प्रकारानुसार, लॅक्टाएआय मोठ्या दुग्धव्यवसाय प्रकल्पांना प्रति प्लांट वार्षिक २.३५ कोटी ते २८.२ कोटी रुपयांपर्यंतचे अतिरिक्त मूल्य मिळवून देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे प्लॅटफॉर्म उत्पादनात ०.५ ते १.५ टक्क्यांनी वाढ, बाष्पीभवन आणि ड्रायिंग प्रक्रियेत ५ ते १० टक्के ऊर्जेची बचत आणि ऑपरेशन्स व फायनान्स क्षेत्रात जलद निर्णय घेण्यास मदत करते.

फाइंडॅबिलिटी सायन्सेसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहूरकर म्हणाले, डेअरी प्लांट्सना केवळ डॅशबोर्ड्सची गरज नाही, तर त्यांना निर्णय घेण्यास सक्षम करणाऱ्या माहितीची गरज आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणाऱ्या डेअरी प्लांटमध्ये, उत्पादनात केवळ १ टक्क्याने झालेली वाढ देखील मोठा आर्थिक परिणाम घडवू शकते. प्लांटमधील डेटाचे रूपांतर कामकाजाच्या अशा निर्णयांमध्ये करण्यासाठी लॅक्टाएआयची निर्मिती करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रत्यक्षात नफा वाढेल.

भारताचे दुग्धक्षेत्र हे जगातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे क्षेत्र आहे. तरीही, बहुतेक प्लांट्समध्ये दररोज दूध संकलन, उत्पादन, गुणवत्ता आणि बिझनेस सिस्टम्समधून लाखो सिग्नल्स निर्माण होतात, ज्यांचा प्रत्यक्ष निर्णय घेण्यासाठी कधीच वापर होत नाही. लॅक्टाएआय ही दरी भरून काढण्यासाठी रिअल-टाइममध्ये तीन प्रश्नांची उत्तरे देते: नक्की काय घडत आहे, ते का घडत आहे आणि त्यात काय सुधारणा करणे आवश्यक आहे.

एकाच प्लॅटफॉर्मवर दोन उत्पादने: लॅक्टाएआय दोन एकात्मिक क्षमता एकत्र आणते:

१. लॅक्टा इन्साईट: हे दूध संकलन, बाष्पीभवन, ड्रायिंग, पॅकेजिंग आणि युटिलिटीजमध्ये रिअल-टाइम प्रक्रिया माहिती प्रदान करते. हे प्रक्रिया केंद्रांना जुन्या पद्धतींऐवजी आधुनिक आणि प्रगत कार्यक्षमतेकडे नेण्यास मदत करते. याचे दोन भाग आहेत: ‘लॅक्टा इन्साईट प्राईम’ (दूध, पनीर, दही, लोणी यासाठी) आणि ‘ लॅक्टा इन्साईट नेक्सस’ (प्रगत व्हे प्रोसेसिंग - डब्ल्यूपीसी, डब्ल्यूपीआय, लॅक्टोज इत्यादींसाठी).

२. लॅक्टा बीपीसी: हा एक ‘कॉन्व्हर्सेशनल एआय’ स्तर आहे, जो ऑपरेशन्स आणि व्यवसायाशी संबंधित जटिल प्रश्नांची उत्तरे साध्या भाषेत देतो. हे इआरपी, एमईएस आणि इतर सिस्टम्समधील डेटा वाचून त्याचे विश्लेषण करते आणि पुराव्यासह अचूक उत्तरे देते.

हा प्लॅटफॉर्म सध्या अस्तित्वात असलेल्या प्लांट सिस्टम्सशी (पीएलसी, एससीएडीए, इआरपी इ.) सहज जोडला जाऊ शकतो, त्यामुळे जुन्या यंत्रणा बदलण्याची गरज भासत नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ChiniMandi Marathi