Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सांगली : केन ॲग्रो कंपनीकडून जिल्हा बँकेकडे १६.५० कोटी रुपये थकबाकी जमा

सांगली : केन ॲग्रो कंपनीकडून जिल्हा बँकेकडे १६.५० कोटी रुपये थकबाकी जमा

ChiniMandi Marathi 2 weeks ago

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कडेगावच्या केन ॲग्रो साखर कारखान्याला मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा केला आहे. मार्च २०२२ अखेर या कारखान्याकडे व्याजासह तब्बल २२५.५५ कोटी रुपयांची थकबाकी होती.

या प्रकरणात राष्ट्रीय कंपनी लवादाने (एनसीएलटी) जिल्हा बँक आणि कारखाना प्रशासनाच्या सहमतीने कर्जवसुलीसाठी सात वर्षांचा ‘ॲक्शन प्लॅन’ मंजूर केला आहे. त्या योजनेनुसार कारखान्याने पुढील सात वर्षांत टप्प्याटप्प्याने संपूर्ण थकीत कर्जाची परतफेड करायची आहे. पहिला हप्ता मार्च २०२५ अखेर दोन टप्प्यांत भरून कंपनीने १८.८३ कोटी रुपये जिल्हा बँकेत जमा केले होते. त्यानंतर आता दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. कंपनीने १६.५० कोटी रुपये जमा केले आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक म्हणाले, केन ॲग्रो कंपनीकडे जिल्हा बँकेची सुमारे २२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. राष्ट्रीय कंपनी लवादाने मंजूर केलेल्या सात वर्षांच्या ॲक्शन प्लॅननुसार कंपनीकडून हप्त्यांमध्ये परतफेड सुरू आहे. मार्च २०२६ अखेर ४५ कोटी रुपये अपेक्षित होते. त्यापैकी १६.५० कोटी रुपये जमा झाले असून, उर्वरित रक्कम लवकरच मिळणार आहे. याबाबत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ म्हणाले की, मार्च २०२६ अखेर भरणा रकमेपैकी १६.५० कोटी भरले आहेत. उर्वरित रक्कम ५ मे रोजी भरली जाईल, असे कंपनीने सांगितले आहे. मार्च २०२६ अखेर ४५ कोटी रुपये भरणे अपेक्षित होते. उर्वरित रक्कम मेच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती बँक प्रशासनाकडून देण्यात आली. प्रलंबित असलेल्या या कर्जवसुलीला गती मिळू लागल्याने जिल्हा बँकेला मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ChiniMandi Marathi