सातारा : किसन वीर सातारा साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी कोल्हापूर येथील उत्तम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. पाटील हे सोलापूरच्या पांडुरंग साखर कारखान्यात कार्यरत असताना 'व्हीएसआय'कडून त्यांना 'बेस्ट चीफ इंजिनिअर' म्हणून गौरविण्यात आले होते.
उदगीर शुगरचे कार्यकारी संचालक असताना, त्यांना २०२२ मध्ये ‘उत्कृष्ट कार्यकारी संचालक म्हणून गौरवण्यात आले होते.
पाटील यांची किसन वीर-खंडाळा कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून २४ जून २०२५ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. तेथे त्यांनी मागील हंगामात कमी दिवसांमध्ये उसाचे जास्त गाळप करुन दाखवली होती. त्यांची किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी एकमताने निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा खासदार नितीन पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे व संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

