Dailyhunt
सातारा : ऊस बिले थकविणाऱ्या साखर कारखानदारांवर कारवाईची काँग्रेसची मागणी

सातारा : ऊस बिले थकविणाऱ्या साखर कारखानदारांवर कारवाईची काँग्रेसची मागणी

सातारा : सर्वसामान्य माणसाने बँकेचे कर्ज थकले की जप्ती आणणारे प्रशासन कोट्यवधी रुपये थकविणाऱ्या कारखानदारांसमोर नतमस्तक का होते? नियम फक्त शेतकऱ्यांसाठीच आहेत का? साखर कारखान्यांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत.

जिल्ह्यातील कारखान्यांनी थकीत एफआरपी लवकरात लवकर अदा करावी, अशी मागणी काँग्रेसच्यातीने करण्यात आली आहे. कायद्यानुसार १४ दिवसात एफआरपी देणे बंधनकारक असताना कारखानदार शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून कारखानदारांना एफआरपी अदा करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी काँग्रेसने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी अदा केलेली नाही. गळीत हंगाम संपून आता दीड महिना उलटला तरी अनेक कारखान्यांनी पैसे दिलेले नाही. खरेतर शुगरकेन कंट्रोल ऑर्डर १९६६ मधील तरतुदीनुसार एफआरपीला विलंब झाल्यास १५ टक्के व्याज देणे अनिवार्य आहे. मात्र, तसे होत नाही. यावेळी किसान काँग्रेस अध्यक्ष वसीम इनामदार, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा राजेघोरपडे, डॉ. शंकर पवार, कमलेश शिंदे, ॲड. नाझनीन फकीर, अवधूत निकम आदी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ChiniMandi Marathi