भारतीय साखर बातम्या
तांत्रिक बिघाडामुळे कारखाना बंद, शेतकरी हवालदिल
Representational Image
हसनपूर : कालाखेडा येथील सहकारी साखर कारखान्यातील ऊसाचे गाळप तांत्रिक बिघाडामुळे १२ तास बंद राहिले. उसासोबत ट्रॅक्टरमधील लोखंडी पाटा कारखान्याच्या चेनमध्ये अडकल्याने हा बिघाड झाल्याचे सांगण्यात येते. बारा तासांनंतर अथक प्रयत्नांनी पुन्हा गाळप सुरू करण्यात प्रशासनाला यश आले.
बुधवारी सकाळी साखर कारखान्यात गाळप बंद पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितली. चेनमध्ये लोखंडी वस्तू अडकल्याने कामकाज ठप्प झाले. त्यानंतर उसाचा वजनकाटा बंद करण्यात आला. कारखान्याच्या तंत्रज्ञांनी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. बारा तासांनंतर हा बिघाड दुरुस्त झाला. ऊस टाकताना शेतकऱ्याकडून ट्रॅक्टरमधील लोखंडी पाटा टाकला गेला असावा. यामुळे कारखान्याच्या कटर आणि चेनचे खूप नुकसान झाले. याशिवाय ऊस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले. साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, तांत्रिक बिघाडामुळे कारखाना काही काळ बंद राहिला. दुरुस्तीनंतर पुन्हा गाळप सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी सोमवारी आरबीसी मोटर जळाल्याने उसाचे गाळप काही तास बंद राहिले होते.
Image courtesy of Admin.WS