मेरठ : उसाच्या को-०२३८ या जातीवरील लाल सड रोगामुळे आणि अतिवृष्टीमुळे उसाचे उत्पन्न २० टक्क्यांनी घटले असून, मेरठ आणि सहारनपूर विभागातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या रोगामुळे उसाचे पीक १५ ते २० टक्क्यांनी घटले आहे, तर उर्वरित नुकसान लाल कोळी आणि पांढऱ्या माश्यांनी उसातील रस शोषून घेऊन पूर्ण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे २००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मेरठ, सहारनपूर आणि बिजनौर या विभागातील शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले आहे.
कृषी शास्त्रज्ञांच्या मते, प्रतिकूल हवामानामुळे उसावर लाल कोळी, पतंग आणि पांढरी माशी यांचा फैलाव झाला आहे. साखर कारखान्यांकडील आकडेवारीनुसार, शामली, सहारनपूर, मुझफ्फरनगर, बागपत, बुलंदशहर, हापूर आणि बिजनौर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये उसाचे उत्पादन १० ते २० टक्क्यांनी घटले आहे. अतिवृष्टीनेही या नुकसानीत भर घातली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील मुसळधार पावसामुळे उसाचे अनेक कोंब फुटले नाहीत. सहारनपूर, शामली, मुझफ्फरनगर, मेरठ, बागपत, हापूर, बुलंदशहर आणि बिजनौरमध्ये उत्पादनात घट झाली आहे. सहारनपूर आणि शामलीचे सर्वाधिक २० टक्के नुकसान झाले आहे. कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी डॉ. संदीप चौधरी यांच्या मते, लाल कोळी आणि पांढरी माशी यांच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. हे दोन्ही कीटक पानांच्या खालच्या बाजूने रस शोषून घेतात. यामुळे उत्पादनात घट झाली आहे.

