Dailyhunt
उत्तर प्रदेश : लिपिकाकडून बदलीसाठी लाच घेतल्याप्रकरणी मुख्य ऊस अधिकाऱ्याला अटक

उत्तर प्रदेश : लिपिकाकडून बदलीसाठी लाच घेतल्याप्रकरणी मुख्य ऊस अधिकाऱ्याला अटक

ChiniMandi Marathi 2 weeks ago

बागपत : ऊस खरेदी केंद्रातील लिपिकाची दुसऱ्या खरेदी केंद्रात बदली करण्यासाठी १५,००० रुपयांची लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (एसीबी) मुख्य ऊस अधिकारी राजदीप बलियान यांना अटक केली.

बदलीसाठी २०,००० रुपयांची लाच मागण्यात आली होती आणि नकार दिल्यावर त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर आपण १५,००० रुपये देण्यास तयार झाल्याचे विशेष कुमार यांनी सांगितले. सरूरपूर कलान येथे विशेषकुमार यांची बदली करण्यात येणार होती. त्यानी एसीबीकडे तक्रार केली.

विशेष कुमार हे बुधवारी लाच देण्यासाठी मुख्य ऊस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोच्या (एसीबी) पथकाने १५,००० रुपयांची लाच घेत असताना मुख्य ऊस अधिकारी राजदीप बलियान यांना अटक केली. त्यानंतर अनेक तोलाईदारांनी मुख्य ऊस अधिकाऱ्यांवर मासिक लाच घेत असल्याचा आरोप केला. लाच देण्यास नकार दिल्यामुळे एका कामगाराला चार महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते, असाही त्यांनी आरोप केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपींची चौकशी सुरू केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ChiniMandi Marathi