Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली,मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल.

Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली,मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल.

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (८८) यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना राळेगणसिद्धी येथून पुढील विशेष वैद्यकीय उपचारांसाठी काल रात्री तातडीने मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) कडक वैद्यकीय देखरेखीखाली उपचार चालू आहेत. डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, समाजसेविका अंजली दमानिया यांनी एक पोस्ट करुन अण्णा हजारेंची प्रकृती बिघडल्याची माहिती दिली आहे. तसंच त्यांची प्रकृती आता स्थिर आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

Pune : पुण्यात अमित ठाकरेंनी काढायला लावला पंतप्रधान मोदींचा फोटो; नेमकं काय घडलं…? पाहा Video

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बॉम्बे हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. तीव्र डिहायड्रेशन, व्हायरल इन्फेक्शनमुळे त्यांच्यावर डॉ. गौतम भंसाली यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आत्ताच डॉ भंसाली यांच्याकडे त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. ते स्टेबल आहेत असे त्यांनी सांगितले. अण्णांनी आयुष्यभर समाजासाठी संघर्ष केला. त्यांना लवकरात लवकर बरे वाटो हीच ईश्वरचरणी प्रार्थना."

अतिदक्षता विभागात उपचार सुरु….

अनेक दिवसांपासून अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना प्रचंड खोकला, तीव्र ताप, अशक्तपणा आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे असा त्रास होत होता. प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने आणि आजारपणामुळे ते अत्यंत अशक्त झाल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी अशक्तपणामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

अण्णा हजारे यांना बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. प्रसिद्ध फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली अण्णांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टर सध्या त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करत असून, या चाचण्यांच्या अहवालानंतर पुढील उपचारांची दिशा ठरवली जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror