Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
FIFA World Cup 2026 : रोनाल्डोचा स्वप्नभंग; स्पेनविरुद्धच्या पराभवामुळे पोर्तुगाल बाहेर.

FIFA World Cup 2026 : रोनाल्डोचा स्वप्नभंग; स्पेनविरुद्धच्या पराभवामुळे पोर्तुगाल बाहेर.

र्लिंग्टन (टेक्सास) : उपउपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालला स्पेनविरुद्ध ०-१ असा पराभव पत्करावा लागल्याने फुटबाॅलविश्वातील सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न मंगळवारी (दि.

७) भंगले.

उभय संघांतील ही लढत अतिशय अटीतटीने खेळली गेली. पूर्वार्ध तसेच निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, दोन्ही संघांची बचाव फळी अभेद्य होती. निर्धारित ९० मिनिटांनंतर इन्जुरी टाइमधील पहिल्याच मिनिटाला मिकेल मरिनाने स्पेनला विजय मिळवून देणारा गोल केला. या पराभवानंतर ४१ वर्षीय रोनाल्डोला अश्रू अनावर झाले होते. मैदानावर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. डलास स्टेडियममधून बाहेर पडताना चाहत्यांनी उभे राहून रोनाल्डोचा सन्मान केला. त्याने गंभीर चेहऱ्याने चाहत्यांना अभिवादन करीत स्टेडियम सोडले.

FIFA World Cup 2026 : हालँडच्या झंझावाताने ब्राझील आऊट …

रोनाल्डोने २००६ च्या विश्वचषकात पदार्पण केले होते. त्याच स्पर्धेत त्याने पोर्तुगालला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले. ही त्याच्या विश्वचषक कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. २०१८च्या विश्वचषकात स्पेनविरुद्धच्या गट सामन्यात त्याने अविस्मरणीय हॅटट्रिक केली होती. ३-३ अशा बरोबरीत संपलेला तो सामना विश्वचषक इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक मानला जातो.

सलग सहा सामन्यांमध्ये गोल न स्वीकारण्याचा स्पेनचा विश्वविक्रम

स्पेन वर्ल्ड कप इतिहासात सलग सर्वाधिक सामन्यांपर्यंत गोल न स्वीकारणारा संघ बनला आहे. स्पेनने सलग सहाव्या सामन्यात एकही गोल स्वीकारलेला नाही. या बाबतीत स्पेनने इटली (१९९०) आणि स्वित्झर्लंडचा (२००६ आणि २०१०) विक्रम मोडला. दोन्ही संघांनी सलग पाच विश्वचषक सामन्यांमध्ये गोल स्वीकारला नव्हता.

स्पेनचा २९ वर्षीय गोलरक्षक यूनाय सिमोनने सलग ६०९ मिनिटांपर्यंत गोल न गमावण्याचा वर्ल्ड कपचा नवा विक्रम रचला. त्याने ऑस्ट्रियाविरुद्धच्या नॉकआउट सामन्यात इटलीचे दिग्गज गोलकीपर वॉल्टर जेंगाचा ५१७ मिनिटांचा विक्रम मागे टाकला होता. सिमोनने २०२२ वर्ल्ड कपमध्ये जपानविरुद्ध शेवटचा गोल स्वीकारला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror