महिला गटातून नाओमी ओसाकाचीदेखील आगेकूच…
पॅरिस : महिलांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आर्यना सबालेन्काने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विजयी प्रारंभ केला. तिने स्पेनच्या जेसिका मायनेरोचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आणले.
बेलारुसच्या सबालेन्काने जागतिक क्रमवारीत ५०व्या स्थानी असलेल्या जेसिकावर ७५ मिनिटांच्या सामन्यात दोन सरळ सेटमध्ये ६-४, ६-२ अशी सरशी साधली.
सबालेंकाने ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ पासून महिला एकेरीत सर्वाधिक ३० ग्रँड स्लॅम सामने जिंकले आहेत. तिच्यापेक्षा जास्त सामने जिंकण्याचा विक्रम फक्त पुरुष एकेरी गटात यानिक सिनर (३१) आणि कार्लोस अल्कराज (३१ यांच्या नावावर आहे.
Para Athletics C'ship 2026 : सुमित अंतिलचा भालाफेकीत नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड, बेंगळुरूमध्ये रचला इतिहास…
Make Civic Mirror My Trusted Source
सबालेन्का उष्णतेने त्रस्त दिसली. सामना संपताच, उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तिने चेहऱ्यावर बर्फ लावला. विजयानंतर सबालेन्का म्हणाली- 'मी माझ्या नेट गेममध्ये सुधारणा केली आहे. आता या शैलीत खेळण्याचा आनंद घेत आहे.' महिला एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाने विजय मिळवला. तर, पुरुष गटात रशियाचा दानिल मेदवेदेव पहिल्याच फेरीत हरला.
ओसाकाने जर्मनीच्या लॉरा सीजमंडला सरळ सेटमध्ये ६-३, ७-६ ने हरवून पुढील फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत ऑस्ट्रेलियाच्या ॲडम वॉल्टनने दानिल मेदवेदेवला पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात ६-२, १-६, ६-१, १-६, ६-४असे हरवले. वॉल्टन जागतिक क्रमवारीत ९७व्या स्थानावर असून तो वाइल्ड कार्डधारक आहे.

