Health News वाहनाला जशी एक ठरावीक वेगमर्यादा असते आणि त्यापलीकडे चालवणे धोकादायक ठरते; तसेच मानवी शरीरालाही मर्यादा असतात. त्या मर्यादेपलीकडे जाऊन ताण दिल्यास दीर्घकालीन गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
पुण्यातील मूत्रपिंड तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, स्नायू जलद वाढवण्यासाठी जिम करणारे तरुण मोठ्या प्रमाणात प्रथिनांचे सेवन करत असून, त्याचा परिणाम त्यांच्या मूत्रपिंडांच्या आरोग्यावर होत आहे. डॉक्टरांच्या मते, शरीराच्या वजनाच्या प्रति किलोमागे १.५ ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिनांचे सेवन जास्त मानले जाते आणि त्यामुळे १ ते ५ वर्षांच्या कालावधीत समस्या निर्माण होऊ शकतात.
पूर्वी अशा प्रकारचे रुग्ण क्वचितच आढळत होते. १५ वर्षांत एखादा रुग्ण; मात्र आता पुण्यात दर आठवड्याला किमान एक रुग्ण, असे आढळत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. २५ ते ४० वयोगटांतील तरुणांमध्ये हे प्रमाण जास्त असून, पुरुषांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. जिम संस्कृती, उच्च प्रथिनयुक्त आहार आणि फिटनेस सप्लिमेंट्सचा वाढता वापर यामुळे मूत्रपिंडांशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टर सांगतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फिट राहणे महत्त्वाचे असले, तरी अतिरेकी आहार पद्धती आणि चुकीची व्यायाम पद्धती दीर्घकालीन धोका निर्माण करतात.
अतिरिक्त प्रथिनांचे सेवन धोकादायक
डॉ. संदीप मोरखंडीकर, सल्लागार मूत्रपिंड तज्ज्ञ आणि प्रत्यारोपण तज्ज्ञ, यांनी सांगितले की, विशेषतः सप्लिमेंट्सच्या माध्यमातून होणारे जास्त प्रथिनांचे सेवन हळूहळू मूत्रपिंडांना हानी पोहोचवते. शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रथिने घेतल्यास मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येतो. ही हानी लगेच दिसून येत नाही. पण कालांतराने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. पूर्वी असे रुग्ण क्वचितच दिसायचे, पण आता दर आठवड्याला किमान एक रुग्ण असा येतो, ज्याच्या समस्यांचा संबंध जास्त प्रथिनांचे सेवन किंवा सप्लिमेंट्सच्या गैरवापराशी असतो.
अतिव्यायामही धोकादायक
डॉ. सुरेश पाटणकर यांनीही सांगितले, की "अत्यंत मोठ्या प्रमाणात अमिनो आम्ले घेतल्यास मूत्रपिंडांना निश्चितच हानी होते. अधिक प्रथिने म्हणजे अधिक आरोग्य असे नाही. डॉक्टरांनी विशेषतः नवशिक्यांना अचानक तीव्र व्यायाम करण्याबाबत सावध केले आहे. फिटनेस ही एक हळूहळू विकसित होणारी प्रक्रिया आहे. जिम हा एक दिवसाचा प्रकार नाही. शरीराला सवय होण्यासाठी किमान तीन ते सहा महिने लागतात. शरीराची तयारी नसताना अचानक कठीण व्यायाम सुरू केल्यास दुखापती होण्याची शक्यता जास्त असते. एका आठवड्यातच स्नायूंना इजा होऊ शकते आणि सहनशक्ती कमी होऊ शकते, असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.
लक्षणे सूक्ष्म आणि दुर्लक्षित
डॉ. मोरखंडीकर यांनी सांगितले की, अशा दुखापतींनंतर लोक वेदनाशामक औषधे घेतात, ज्यामुळे मूत्रपिंडांचे नुकसान अधिक वाढू शकते.
वेदना कमी करण्यासाठी वारंवार घेतली जाणारी औषधे मूत्रपिंडांवर विपरीत परिणाम करू शकतात. मूत्रपिंडाच्या आजारांमधील मोठे आव्हान म्हणजे सुरुवातीची लक्षणे फारशी स्पष्ट नसतात. पाय किंवा चेहऱ्यावर सूज येणे, सहनशक्ती कमी होणे किंवा स्नायूंच्या तक्रारी ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात. मात्र, अनेक रुग्ण हे बदल दुर्लक्षित करतात, असा इशारा डॉ. मोरखंडीकर यांनी दिला. त्यांनी नियमित तपासण्यांचे महत्त्व अधोरेखित केले. साध्या रक्त तपासण्यांमधूनही मूत्रपिंडांच्या समस्या लवकर ओळखता येतात. अनेक जिम आता अशा तपासण्यांचा सल्ला देतात, असे त्यांनी सांगितले.
तरुणांमध्ये अधिक प्रमाण
२५ ते ४० वयोगटांतील तरुण पुरुषांमध्ये या समस्या अधिक दिसून येतात. स्नायू वाढवण्यासाठी प्रथिनांचे जास्त प्रमाणात सेवन करणाऱ्यांमध्ये हा धोका जास्त असतो, मूत्रपिंड शरीरातील कॅल्शियम-फॉस्फरस संतुलन, रक्तदाब, हिमोग्लोबिन आणि द्रव संतुलन नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे दीर्घकालीन नुकसानाचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो, असे डॉ. मोरखंडीकर यांनी सांगितले.
संतुलित फिटनेसच सुरक्षित
तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास तो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नियमित व्यायामामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो, चयापचय सुधारतो आणि औषधांवरील अवलंबित्व कमी होते. व्यायामात स्नायू प्रशिक्षण, कार्डिओ, योग आणि एरोबिक्स यांचा समावेश असावा. शरीरात पुरेसे पाणी आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखणेही आवश्यक आहे.फिटनेस हा झटपट परिणामांसाठी नसून दीर्घकालीन आरोग्यासाठी असावा. संतुलित दृष्टिकोन हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे, असे डॉ. पतंकर यांनी सांगितले
डॉक्टरांच्या फिटनेससाठी विशेष सूचना-
सुरक्षित पद्धतींचे पालनगरजेचे
दररोज शरीराच्या वजनाच्या प्रति किलोमागे १.५ ग्रॅमपर्यंतच प्रथिनांचे सेवन करावे.
व्यायामाची तीव्रता हळूहळू वाढवावी.
व्यायामादरम्यान पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
वेदनाशामक औषधांचा स्वतःहून वापर टाळावा.
मूत्रपिंड आणि यकृत तपासण्यासाठी नियमित रक्त तपासण्या कराव्यात.
सुरक्षित फिटनेससाठी गाईडलाईन
प्रथिनांचे सेवन १.५ ग्रॅम प्रति किलो वजन मर्यादेत ठेवावे
व्यायामाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढवावी
व्यायाम करताना पुरेसे पाणी प्यावे
वेदनाशामक औषधांचा वापर टाळावा
नियमित रक्त तपासणी करून आरोग्य तपासावे
मूत्रपिंडांच्या समस्येची सौम्य लक्षणे
सुरुवातीला स्पष्ट लक्षणे नसतात
लक्षणे सौम्य असल्याने दुर्लक्षित होतात
चेहरा किंवा पाय सुजणे
सहनशक्ती कमी होणे किंवा थकवा
स्नायूंशी संबंधित तक्रारी
अनेकांना समस्या वाढल्यानंतरच जाणवते
'एक्स्ट्रा प्रोटीन' ठरेल किडनीला घातक!
स्नायू जलद कमवण्यासाठी जिममध्ये जाणाऱ्या तरुणांमध्ये प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याचे वेड वाढले आहे. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त प्रथिनांचे सेवन मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण निर्माण करते. पुण्यात दर आठवड्याला असा किमान एक रुग्ण आढळत आहे, ही चिंतेची बाब आहे. विशेषतः २५ ते ४० वयोगटातील तरुणांनी हे लक्षात ठेवावे की, शरीराला व्यायामाची सवय होण्यास किमान ३ ते ६ महिने लागतात. झटपट रिझल्ट मिळवण्यासाठी घेतलेली सप्लिमेंट्स आणि वेदनाशामक औषधे भविष्यात डायलिसिस किंवा प्रत्यारोपणाची वेळ आणू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आहार घ्यावा.
जिममध्ये नियमित व्यायाम करताना तरुणांनी किडनीची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. प्रोटीनची मात्र योग्य प्रमाणात घ्या-जास्त प्रोटीन किडनीसाठी हानिकारक ठरू शकतात. वजन उचलताना किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करताना योग्य तंत्र वापरा; चुकीच्या पद्धतीमुळे शरीरावर आणि किडनीवर ताण येतो. प्रोसेस्ड फूड, जास्त खारट पदार्थ आणि जास्त साखर टाळा, कारण अतिरिक्त साखर किडनीला हानी पोहोचवू शकते. नियमित रक्तदाब, युरीन तपासणी आणि शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन तपासणे गरजेचे आहे. पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे विसरू नका, जेणेकरून किडनी योग्यरीत्या कार्य करू शकेल. व्यायामानंतर शरीराचे पुनरुत्थान आणि हायड्रेशन सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक

