Dailyhunt
IPL 2026 | विदेशी फलंदाजांपेक्षा देशीच भारी! आयपीएलच्या १९व्या हंगामात भारतीय फलंदाजांचे विक्रमी योगदान.

IPL 2026 | विदेशी फलंदाजांपेक्षा देशीच भारी! आयपीएलच्या १९व्या हंगामात भारतीय फलंदाजांचे विक्रमी योगदान.

कूण धावांमध्ये ६९. २१टक्के वाटा, स्ट्राइक रेटमध्ये अव्वल…

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये पूर्णपणे भारतीय फलंदाजांचे वर्चस्व दिसत आहे. आतापर्यंत ३८ सामन्यांमध्ये एकूण १३,१०० धावा झाल्या आहेत.

यापैकी भारतीय फलंदाजांनी ९,०६६ धावा केल्या आहेत, जे एकूण धावांच्या ६९.२१ टक्के आहे. एका हंगामातील सुरुवातीच्या ३८ सामन्यांनंतर भारतीय फलंदाजांच्या योगदानाचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

गेल्या वर्षी या टप्प्यापर्यंत ३८ सामन्यांत १२,८५८ धावा झाल्या होत्या. यात भारतीय फलंदाजांनी ६६.२५ टक्के योगदान दिले होते. आयपीएलच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये हा आकडा ५० टक्क्यांच्या आसपास राहत असे. २००९ मध्ये हे प्रमाण ४७.५१ टक्क्यांपर्यंत खाली घसरले होते. पण या वर्षी भारतीय फलंदाजांनी धावांचा जो डोंगर रचला आहे, त्याने परदेशी फलंदाजांची चमक फिकी केली आहे. परदेशी फलंदाजांनी या हंगामात १३,१०० पैकी ३०.७९ टक्के म्हणजे ४,०३४ केल्या आहेत. हे प्रमाण भारतीय फलंदाजांच्या निम्मेही नाही.

स्ट्राइक रेट आणि सरासरीतही भारतीय फलंदाज अव्वल

स्ट्राइक रेटमध्येही भारतीय फलंदाजांनी परदेशी फलंदाजांना मागे टाकले आहे. या हंगामात झालेल्या एकूण धावांमध्ये स्ट्राइक रेट १५४.१७ राहिला आहे. यामध्ये भारतीय फलंदाजांच्या ९,०६६ धावा १५८.८६च्या स्ट्राइक रेटने आल्या आहेत, तर परदेशी फलंदाजांनी १४४.५९ च्या स्ट्राइक रेटने योगदान दिले आहे. म्हणजेच, या वर्षी भारतीय फलंदाजांचा स्ट्राइक रेट परदेशी फलंदाजांच्या तुलनेत तब्बल १४.२७ ने जास्त आहे.

आयपीएलच्या १९ वर्षांत हा खूप मोठा बदल आहे. यापूर्वी फक्त दोन वेळा (२०१० आणि २०११) असे घडले होते, जेव्हा भारतीयांनी परदेशी खेळाडूंपेक्षा वेगाने धावा केल्या होत्या, पण तेव्हाही हा फरक खूप कमी होता. धावांच्या सरासरीतही भारतीय फलंदाज (२९.४४) परदेशी फलंदाजांपेक्षा (२६.५४) सरस आहेत.

स्ट्राइक रेटमध्ये एक ते अकरा भारतीयच

भारतीय फलंदाजीच्या खोलीचा अंदाज यावरून लावता येतो की, या हंगामात २०० किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या २४ खेळाडूंपैकी १९ फलंदाज भारतीय आहेत. यापैकी सर्वोत्तम स्ट्राइक रेट असलेले टॉप अकरा फलंदाज फक्त भारतीय आहेत. परदेशी फलंदाजांमध्ये पहिले नाव फिल सॉल्टचे येते. तो. १२व्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर १३व्या क्रमांकावर कूपर कोनोली आहे. आरसीबीसाठी टिम डेव्हिडने नक्कीच १९४.६८ च्या स्ट्राइक रेटने उत्कृष्ट फलंदाजी केली आहे, परंतु एकूण १८३ धावा असल्यामुळे तो २०० धावांच्या कट ऑफमधून बाहेर आहे.

पहिल्यांदाच एखाद्या हंगामात २००+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये टॉप टेन स्ट्राइक रेट भारतीय फलंदाजांचा आहे. यापूर्वी सर्वात जवळचा आकडा २०११ मध्ये होता, जिथे पहिले आठ फलंदाज भारतीय होते. तथापि, तेव्हा वीरेंद्र सेहवागचा १६८.४२ चा स्ट्राइक रेट सर्वोत्तम होता, तर यावेळी सर्व अव्वल अकरा भारतीयांचा स्ट्राइक रेट त्याच्यापेक्षा जास्त आहे.

विदेशी दिग्गजांचा फ्लॉप शो

एकीकडे फलंदाजीत भारतीय यंग स्टार्स वादळी प्रदर्शन करत आहेत, तर दुसरीकडे जगभरातील टी२० लीगमध्ये खेळणारे मोठे परदेशी खेळाडू पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. एरवी कसोटीतही टी२० स्टाइल फटकेबाजी करणारा ट्रॅव्हिस हेड आणि एडन मार्करमसारख्या दिग्गजांची कामगिरी थोडी चांगली राहिली आहे, पण तेही आठ डावांमध्ये अद्याप २०० धावांचा आकडा गाठू शकले नाहीत आणि त्यांचा स्ट्राइक रेटही दीडशेपेक्षा कमी राहिला आहे.

अनकॅप्ड खेळाडूंचा धमाका

अनकॅप्ड खेळाडूंचा सर्वोत्तम हंगाम : सर्वाधिक योगदान-सर्वाधिक पुरस्कार भारतीय अनकॅप्ड खेळाडूंनी २७५७ धावा केल्या आहेत, जे कोणत्याही हंगामातील पहिल्या ३८ सामन्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यांचा स्ट्राइक रेट १६०.४८ हा देखील कोणत्याही हंगामातील सर्वोत्तम राहिला आहे. स्ट्राइक रेटच्या बाबतीत अव्वल अकरामध्ये चार अनकॅप्ड भारतीय आहेत. प्रियांशने २४९.०१ च्या स्ट्राइक रेटने गोलंदाजांची धुलाई केली आहे, तर वैभव २३४.८६ च्या स्ट्राइक रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रभसिमरन आणि आयुष म्हात्रे यांनी दिग्गजांना मागे टाकले आहे. या हंगामात अनकॅप्ड भारतीयांनी सहा वेळा 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब जिंकला आहे, जो एक नवीन विक्रम आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror