Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ishita Dutta : इशिताचे रोखठोक उत्तर

Ishita Dutta : इशिताचे रोखठोक उत्तर

बॉलिवूडमध्ये कलाकारांना मिळणाऱ्या संधी आणि त्यामागील ओळखी किंवा गॉडफादर यावर नेहमीच उलट-सुलट चर्चा रंगत असतात. अभिनेत्री इशिता दत्ता हिच्याबाबतही असाच प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो.

अभिनेता अजय देवगणसोबत तिने एकामागून एक अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केल्यामुळे तिला त्याच्या ओळखीचा आणि प्रभावाचा मोठा फायदा होतो, अशी चर्चा नेहमीच बॉलिवूडच्या गोटात सुरू असते. आता या सर्व चर्चांवर इशिता दत्ताने स्वतः मोकळेपणाने भाष्य करत सर्वांचे तोंड बंद केले आहे.

अजय देवगणशी असलेल्या व्यावसायिक संबंधांमुळे तिला चित्रपट मिळतात, असा समज काहींचा असला, तरी इशिता या मुद्द्याकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. ती म्हणाली की, लोकांना त्यांच्या मतानुसार दृष्टिकोन ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. लोक आपल्या कारकिर्दीबद्दल काय विचार करतात यापेक्षा आपण कॅमेऱ्यासमोर काम कसे करतो आणि स्वतःला कसे सिद्ध करतो, हे तिच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.

इशिताने स्पष्ट केले की, केवळ अजयशी ओळख आहे म्हणून तिला कोणत्याही भूमिकेची खैरात मिळालेली नाही. 'दृश्यम' चित्रपटातील अंजू साळगावकर या अजयच्या मुलीच्या भूमिकेसाठी तिने रीतसर ऑडिशन दिली होती. ऑडिशनमध्ये निवड झाल्यानंतरच तिला तो चित्रपट मिळाला. त्यानंतर 'दृश्यम २' आणि 'दृश्यम: द कन्क्लुजन' या पुढील भागांमध्ये तिच्या पात्राची कथा पुढे जात राहिली, त्यामुळे ती या फ्रँचायझीचा भाग बनून राहिली.

इतकेच नाही तर 'दे दे प्यार दे २' या चित्रपटासाठीही तिची निवड ऑडिशनच्या माध्यमातूनच झाली होती. विशेष म्हणजे, ज्या कास्टिंग डायरेक्टरने 'दृश्यम'साठी तिची निवड केली होती, त्यांनीच तिला 'दे दे प्यार दे २'साठी कास्ट केले. त्यामुळे काम मिळण्यामागे केवळ ओळख नसून कठोर परिश्रम, ऑडिशन आणि योग्य कास्टिंग प्रक्रिया हीच खरी कारणे असल्याचे तिने सांगितले.

Jasmine Dhunna : 'वीराना' गर्ल कुठाय?

सध्या इशिता तिच्या आईपणाच्या नव्या प्रवासासोबतच 'दृश्यम: द कन्क्लुजन'च्या शूटिंगमुळे चर्चेत आहे. दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान निर्माते आणि टीमने तिच्या सोयीनुसार वेळापत्रकात आवश्यक बदल केले. बाळाला सेटवर आणण्याची परवानगी आणि मिळालेल्या पूर्ण सहकार्यामुळेच आईपणाची जबाबदारी सांभाळत काम करणे शक्य झाल्याची कृतज्ञताही तिने व्यक्त केली

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror