Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Kerala Politics : केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ , ईडीने निवासस्थानासह १० ठिकाणी टाकले छापे.

Kerala Politics : केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ , ईडीने निवासस्थानासह १० ठिकाणी टाकले छापे.

तिरुवनंतपुरम : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी (दि.२७) केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानासह १० ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई त्यांच्या मुलगी टी. वीणा यांच्या एक्सालॉजिक सोल्युशन्स या आयटी कंपनीशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात करण्यात आली.

हे प्रकरण कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड (सीएमआरएल) प्रकरणाशी संबंधित असून ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत तपास सुरू केला आहे. मंगळवारी केरळ उच्च न्यायालयाने सीएमआरएलची याचिका फेटाळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली. कंपनीने ईडीची चौकशी रद्द करण्याची मागणी केली होती.

आरोपानुसार, सीएमआरएलने २०१८-१९ दरम्यान टी. वीणा यांच्या एक्सालॉजिक सोल्युशन्स कंपनीला १.७२ कोटी रुपये दिले होते. मात्र कोणतीही आयटी किंवा सॉफ्टवेअर सेवा न देता हा खर्च दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीने २०२४ मध्ये पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची चौकशी सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ) कडूनही केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror