Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Lonavala : भुशी डॅम ओव्हरफ्लो, संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ.

Lonavala : भुशी डॅम ओव्हरफ्लो, संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ.

पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

लोणावळा शहर आणि परिसरात मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो झाले आहे.

शुक्रवारी (दि.३) सकाळी धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याचे वृत्त समजताच पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, वीकेंडला येथे वर्षाविहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील २४ तासांत लोणावळा शहरात तब्बल ११६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आणि पाणी ओसंडून वाहू लागले. धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सकाळीच गर्दी केली होती.

Monsoon Session 2026 : इंद्रायणी प्रदूषणावरून नाना पटोले आक्रमक, सरकारकडून उपाययोजनांचे आश्वासन…

Make Civic Mirror My Trusted Source

लोणावळा खंडाळा तसेच भुशी धरणाच्या वरील बाजूला असलेल्या डोंगर भागात पाऊस सुरू आहे. गुरुवारी (दि.2 जुलै) तीन ते चार फूट खाली असलेले धरण सकाळपर्यंत पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या भिंतीवरून पायऱ्यांवर पाणी येऊ लागले आहे. त्यामुळे उद्याच्या शनिवार व रविवारी लोणावळ्यात वर्षाविहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन, लोणावळा पोलीस आणि वन्यजीव विभाग सतर्क झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणाच्या परिसरात पाण्याचा प्रवाह वाढू शकतो. त्यामुळे पर्यटकांनी पाण्यात उतरताना काळजी घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि अतिउत्साहाच्या भरात स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन लोणावळा पोलिसांनी केले आहे.

वीकेंडला पर्यटकांची मांदियाळी

लोणावळ्यातील पावसाळी वातावरण आणि भुशी धरणाचा ओव्हरफ्लो अनुभवण्यासाठी मुंबई, पुणे आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक दरवर्षी येथे येतात. आता धरण पूर्ण भरल्यामुळे शनिवार आणि रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळू शकते. पर्यटकांच्या गर्दीमुळे महामार्गावर आणि शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त आणि वाहतुकीचे नियोजन करण्यात येत आहे. पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, हीच प्रशासनाची अपेक्षा आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror