Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Maharashtra Epstein Files : दीपाली सय्यदला धमकी? 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' चित्रपटातील भूमिकेवरून खळबळ.

Maharashtra Epstein Files : दीपाली सय्यदला धमकी? 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' चित्रपटातील भूमिकेवरून खळबळ.

Maharashtra Epstein Files : गेल्या काही वर्षांत समाजात घडलेल्या मोठ्या आणि विवादास्पद घटनांवर चित्रपट काढण्याचा ट्रेंड वाढला आहे. या मालिकेत आता राज्यासह देशात गाजलेल्या वादग्रस्त भोंदूबाबत अशोक खरात प्रकरणाचीही भर पडली आहे.

नाशिकमधील या स्वयंघोषित गुरूच्या काळ्या कृत्यांचा आणि लैंगिक अत्याचाराचा पर्दाफाश करणारा 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेता दीपाली सय्यद ( Deepali Sayed )हिने आपल्याला फोनवरून धमक्या येत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या भोंदू अशोक खरात ( Ashok Kharat )आणि त्याच्या कारनाम्यांवर येणाऱ्या चित्रपटात सत्ताधारी शिवसेनेची पदाधिकारी दीपाली सय्यद प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहे. दीपाली या चित्रपटात रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत यांचा हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून, पुढील महिन्यापासून चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, या चित्रपटात भूमिका साकारण्यावरून आपल्याला धमक्या येत असल्याचा दावा दिपालीने केला आहे. "हा चित्रपट करू नका, अन्यथा तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करू," अशा धमक्या काही महिला नेत्यांकडून दिल्या जात असल्याचा आरोप दीपालीने केला आहे. शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी दीपालीला पाठिंबा दिला आहे.

यासंदर्भात माहिती देताना दीपाली म्हणाली, ''खरात प्रकरणातील महिला नेत्याची भूमिका साकारू नका, यासाठी माझ्यावर राजकीय दबाव आणला जात आहे. तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त केले जाईल, असे धमकावणारे फोन काही महिला नेत्यांकडून आले आहेत. मात्र मी एक कलाकार आहे आणि कोणाची परवानगी घेऊन काम करत नाही. मला स्क्रिप्ट मिळाली असून, चार महिने 'बिग बॉस'मध्ये असल्यामुळे मला या प्रकरणाची सविस्तर माहिती नव्हती. पण आता सत्य समोर आले आहे. कर नाही त्याला डर कशाचा? मी या दबावाला घाबरत नाही आणि हे प्रकरण पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या कानावर घालणार आहे.''

गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा..! कंगना रणौतने गुपचूप केलं लग्न..? Video Viral

Make Civic Mirror My Trusted Source

दीपालीवर टाकण्यात येत असलेल्या दबावाचा शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी तीव्र निषेध केला आहे. सुशांत शेलार म्हणाले की, ''दीपाली यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कोणती भूमिका करायची हे त्यांनीच ठरवायचे आहे. अशा धमक्यांना त्यांनी भीक घालू नये, शिवसेना चित्रपट सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.''

या चित्रपटाची 'आता सगळं उघड होणार!' ही टॅगलाईन सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सदर चित्रपटात अशोक खरातच्या ढोंगीपणासह या प्रकरणाशी संबंधित महाराष्ट्राच्या राजकारणातील काही प्रभावशाली व्यक्तींचे वास्तवही उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा चित्रपट केवळ एका व्यक्तीच्या कथित कृष्णकृत्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि राजकीय पैलूंवर प्रकाश टाकणारा असल्याचीही चर्चा आहे. यामुळे 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटाबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror