पुणे: शहरातील प्रसिद्ध ब्रँड असणाऱ्या 'नादब्रह्म इडली'च्या (Naadbrahma Idli) गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. येवलेवाडी (Yewalewadi) परिसरातील एका ग्राहकाने नादब्रह्म इडली केंद्रावरून मागवलेल्या इडलीमध्ये चक्क झुरळ निघाल्याचा अत्यंत संतापजनक आरोप केला आहे.
या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी 'सीविक मिरर'ने 'नादब्रह्म'च्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, संबंधित इडली पूर्ण दिसत नसून याबाबत आम्ही सखोल चौकशी करून खात्री करू, अशी प्रतिक्रिया हॉटेल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अन्नसुरक्षेला हरताळ फासणाऱ्या अशा प्रकारांमुळे खाद्यप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

