Norway Chess 2026 : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत आर प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. काल पार पडलेल्या या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रज्ञानंदने रोमहर्षक विजय मिळवून पूर्ण तीन गुण खिशात टाकले.
याउलट, जागतिक विजेता डी गुकेशला मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. अलिरेझा फिरोझाविरुद्ध चुरशीच्या क्लासिकल ड्रॉ नंतर, अंतिम डावात पराभव पत्करावा लागल्याने गुकेशला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
Para Athletics C'ship 2026 : सुमित अंतिलचा भालाफेकीत नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड, बेंगळुरूमध्ये रचला इतिहास…
बुखारेस्ट येथील 'सुपरबेट चेस क्लासिक रोमानिया' मधील प्रभावी कामगिरीनंतर नॉर्वे चेसच्या पूर्वसंध्येला ओस्लोमध्ये दाखल झालेल्या प्रज्ञानंदचा हा विजय म्हणजे एक मोठी कामगिरी आहे. या वर्षीच्या स्पर्धेत कार्लसन आपल्या नेहमीच्या फॉर्मात दिसत नव्हता, तरीही सात वेळच्या चॅम्पियनला त्याच्याच देशात हरवणे ही जागतिक बुद्धिबळातील सर्वात मोठ्या यशांपैकी एक कामगिरी आहे. बुखारेस्ट येथील सुपरबेट चेस क्लासिक रोमानियामध्ये शानदार कामगिरी करून आलेल्या प्रज्ञानंदने आपली तीच लय कायम राखली.
या विजयामुळे भारतीय खेळाडू प्रज्ञानंदचे ४.५ गुण झाले असून नॉर्वे चेसच्या गुणतालिकेत तो दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. आता तो केवळ फिरोझाच्या मागे असून फिरोझा ७.५ गुणांसह अव्वल स्थानी आहे.
दरम्यान, गुकेश ३.५ गुणांवर असून त्याचा खराब फॉर्म कायम असल्याचे दिसत आहे. सहा खेळाडूंच्या या ओपन फील्डमध्ये जागतिक विजेता गुकेश सध्या चौथ्या स्थानावर आहे.

