Dailyhunt
Pimpri Gas Pipeline Blast : मोहननगरमध्ये MNGL गॅस पाईपलाईन फुटली; स्फोटासारखा आवाज अन् एकजण जखमी, पाहा Video.

Pimpri Gas Pipeline Blast : मोहननगरमध्ये MNGL गॅस पाईपलाईन फुटली; स्फोटासारखा आवाज अन् एकजण जखमी, पाहा Video.

Pimpri Gas Pipeline Blast : पिंपरी-चिंचवड शहरातील मोहननगर परिसरात बुधवारी (दि.०८) दुपारी एमएनजीएल कंपनीची पीएनजी गॅस पाईपलाईन फुटल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात स्फोटासारखा मोठा आवाज झाला.

यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पाईपलाईन फुटताच मोठ्या प्रमाणात दगड व माती हवेत उडाली. यावेळी रस्त्यावरून दुचाकीवरून जात असलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर दगड लागल्याने तो जखमी झाला. सुदैवाने जखम किरकोळ असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव करत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. सदर पाईपलाईन एमएनजीएल कंपनीची असून त्याद्वारे पीएनजी गॅसचा पुरवठा केला जातो. पाईपलाईन टाकण्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या घटनेमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा दुर्घटनांना जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित यंत्रणांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मोठा आवाज झाल्यानंतर काही क्षण काय घडले हेच समजले नाही. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आणि गणेश लंगोटे यांनीही या घटनेविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror