पिंपरी | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नव्याने पाच पोलिस ठाण्याचा समावेश होणार आहे. पिरंगुट, जांबे, पिंपळे सौदागर, मोशी, आणि देहूरोड या पाच पोलिस ठाण्यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
प्रस्ताव मंजूर झाल्यास, पुढील काळात पोलिस ठाण्याची संख्या ही 23 वरून 28 वर जाणार आहे. त्यामुळे काही नव्याने देखील पदे देखील निर्माण होणार आहेत. यात परिमंडळ 4 साठी 11 पदे, पिरंगुट पोलिस ठाणे 190, जांबे पोलिस ठाणे 189, पिंपळे सौदागर पोलिस ठाणे 183, मोशी पोलिस ठाणे 194 , देहुगाव पोलीस ठाणे 194 अशी एकूण 961 पदे नव्याने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी निर्मित केली जाणार आहेत.

