Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षाखेरपर्यंत पूर्ण करा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश.

Pune : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षाखेरपर्यंत पूर्ण करा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश.

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी पाहणी केली. या ऐतिहासिक वास्तूचे काम चालू वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण करून पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच ते नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

या पाहणीत त्यांनी स्मारकाच्या प्रत्यक्ष प्रगतीचा आणि प्रस्तावित योजनांचा सविस्तर आढावा घेतला.

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या या जागेचे सामाजिक महत्त्व विचारात घेऊन, स्मारकाची इमारत जुन्या हेरिटेज वास्तुशैलीशी सुसंगत ठेवली जात आहे. इमारतीच्या अंतर्गत भागात ऐतिहासिक वारशाला साजेशी सजावट करण्यावर भर देण्यात आला असून सर्व मजल्यांवरील जागेचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तळमजल्यावर फुले दाम्पत्याचे अर्धपुतळे आणि त्यांच्या जीवनप्रसांगांचे प्रदर्शन असेल, तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर ऑडिओ-व्हिज्युअल, होलोग्राफी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या माध्यमातून त्यांचे योगदान दर्शवले जाईल.

Amit Shah Pune Visit : अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; स्वच्छता आणि खड्डे बुजविण्याचे आयुक्तांचे निर्देश…

Make Civic Mirror My Trusted Source

स्मारकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, संगणक केंद्र आणि कला विकास केंद्र यांसारख्या सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. ऐतिहासिक वारशाचे जतन, दर्जेदार बांधकाम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य समन्वय साधून काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. या पाहणी प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता बिपीन शिंदे, मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, वास्तुविशारद धनंजय साळकर यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror