Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune : करसंकलन विभागाला बसला एसआयआरच्या कामाचा फटका..

Pune : करसंकलन विभागाला बसला एसआयआरच्या कामाचा फटका..

मालमत्ताकराच्या सेवांना विलंब; नागरिकांनी संयम बाळगण्याचे महापालिकेचे आवाहन

पुणे : पुणे महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागातील मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची 'निवडणूक एसआयआर २०२६'च्या विशेष निवडणूक कामकाजासाठी सुनावणीसाठी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यामुळे विभागाच्या नियमित कामकाजावर परिणाम झाला असून मालमत्ता कराशी संबंधित सेवा, विविध अर्ज आणि इतर कामकाजासाठी नागरिकांना विलंबाचा सामना करावा लागत आहे.

निवडणूक कामकाजासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने करसंकलन विभागातील दैनंदिन कामकाजाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. मालमत्ता करासंदर्भातील अर्ज, सेवा आणि इतर प्रशासकीय कामांसाठी महापालिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. या परिस्थितीची दखल घेत पुणे महापालिका प्रशासनाने नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली आहे.

Pune Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यात २७ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त…

Make Civic Mirror My Trusted Source

उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून नागरिकांना शक्य तितक्या कार्यक्षम आणि तत्पर सेवा देण्यासाठी विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 'निवडणूक एसआयआर २०२६'चे कामकाज पूर्ण झाल्यानंतर कर आकारणी व कर संकलन विभागाचे नियमित कामकाज पूर्ववत गतीने सुरू करण्यात येईल. दरम्यान, सध्या कामकाजात काही प्रमाणात विलंब होत असल्यास नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि संयम बाळगावा, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाने केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror