पुणे : खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाजलेल्या गोळीबार प्रकरणानंतर अखेर पुणे शहर पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी ३९ पोलीस अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले.
या बदल्यांमध्ये सर्वाधिक फटका खडक पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि विशेषतः गुन्हे शाखेच्या युनिट-१ (DB) ला बसला आहे. खडक गोळीबार प्रकरणानंतर लगेचच खडक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक यांच्या तत्काळ नियंत्रण कक्षात बदल्या करण्यात आल्या होत्या. खडक पोलीस ठाण्यातील १२ आणि २७ जणांच्या बदल्या गुन्हे शाखेतील झाल्या आहेत.
खडक परिसरातील गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तालयाने प्रशासकीय पातळीवर मोठी कारवाई करत खडक पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचाऱ्यांना मुख्यालयात हलविले आहे. त्याचबरोबर गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्याही मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. काहींना मुख्यालयात, तर काहींना शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये पाठविण्यात आले आहे.
खडक पोलीस ठाण्यातून मुख्यालयात
हर्षल चंद्रकांत दुधम, किरण महादेव डबरे, कृष्णा सुदाम गायकवाड, विकास विरशा पांडळे, दिनेश सुरेश गायकवाड, शुभम बबन केदारी, अक्षयकुमार रवींद्र चावळे, विश्वजित सुमन गोरे, निलेश दत्तात्रय दिवटे, भाग्यश्री भीमराव सोनवणे, पांडुरंग हरिभाऊ गोंगणे आणि सोमनाथ महेंद्रनाथ नदाफ यांची खडक पोलीस ठाण्यातून मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेतून खडक पोलीस ठाण्यात
राहुल देवराम मस्कर, विनोद नारायण शिंदे, मधुरी संपत जाधव, निलेश गौतम सावळे, अमित प्रकाश जमदाडे, मधुर मधुकर मोसले, ज्योती रमेश मुटकुळे, सिद्धेश्वर शांताराम वाघमारे, उमेश मुरसिंग मस्कती, हेमंत विष्णू परणे आणि शशिकांत प्रकाश नगनवरे यांची गुन्हे शाखेतून खडक पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यालयात बदली
अनिकेत अनिल बाबर, सहारा लक्ष्मण डांगे आणि राहुल संजय मोरे यांची गुन्हे शाखेतून मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बदल्या
प्रविण वसंत ढमाळ, रणजित बाळकृष्ण फडतरे आणि सयाजी बबन चव्हाण - स्वारगेट पोलीस ठाणे
दुर्योधन नंदकिशोर गर्व, सचिन रमेश माळवे, रहीम मुसा शेख आणि नितीन सुरेश बोराटे - पर्वती पोलीस ठाणे
मयूर राजेंद्र भोकर, गीतांजली हेमंत जांभुळकर आणि दयानंद नामदेव तेलंगे-पाटील - सहकारनगर पोलीस ठाणे
किरण सुभाष मोरे, बाबासाहेब पांडुरंग दांगडे आणि अतुल अर्जुन साळवे - खंडणी विरोधी पथक-१ मधून गुन्हे शाखा युनिट-१ मध्ये बदली.
आदेशानुसार, संबंधित पोलीस ठाणे आणि शाखा प्रमुखांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करून नव्या ठिकाणी रुजू करण्याची कार्यवाही करावी तसेच त्याचा अनुपालन अहवाल पोलीस आयुक्तालयाकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

