Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune : शेतकर्‍यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यास विलंब, अधिकार्‍यांच्या चौकशीचे महापालिका आयुक्तांचे आदेश

Pune : शेतकर्‍यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यास विलंब, अधिकार्‍यांच्या चौकशीचे महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : देवाची उरूळी आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोसाठी शेतकर्‍यांची जागा घेतल्यानंतर मोबदला देण्यास विलंब लावणारे आणि न्यायालयीन खटल्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शेतकर्‍यांना येत्या दोन तीन दिवसांत त्यांचे पैसे देण्यात येतील. यानंतर या भूसंपादन मोबदला प्रकरणी न्यायालयात अपिल दाखल करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

महापालिकेने देवाची उरूळी आणि फुरसुंगी येथे २००२ मध्ये कचरा डेपोसाठी सुमारे १०० एकर जागा संपादीत केली होती. परंतू भूसंपादनानंतरही काही शेतकर्‍यांचा मोबदला देण्यात आला नव्हता. याविरोधात शेतकर्‍यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानेही शेतकर्‍यांना वाढीव दराने मोबदला देण्याचे आदेश दिले होते. साधारण २०१८ मध्ये देण्यात आलेल्या आदेशानंतरही महापालिका प्रशासनाकडूनकुठलिही हालचाल झाली नव्हती. याविरोधात शेतकर्‍यांनी पुन्हा लघुवाद न्यायालयात दाद मागितली होती.

या न्यायालयाने महिन्याभरापुर्वी मोबदला देण्यास टाळाटाळ करणार्‍या महापालिका प्रशासनाच्या विरोधात आदेश देताना आयुक्तांची खुर्ची व इतर साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार न्यायालयातील बेलिफ सोमवारी शेतकर्‍यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात आले होते. यावरून बराचकाळ राडा सुरु होता. दरम्यान, महापालिकेच्या विधी विभागाने तातडीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत ११ ऑगस्ट पर्यंत शेतकर्‍यांना मोबदला देण्याचे आश्‍वासित केले. यामुळे पुढील कार्यवाही टळली.

Pmc Pune : थोडक्यात वाचली आयुक्तांच्या खुर्चीची जप्ती…! न्यायालयाकडून आदेश अन् पुणे मनपाची धावाधाव; २१ वर्षांच्या लढ्यानंतर शेतकऱ्यांचा विजय

Make Civic Mirror My Trusted Source

यासंदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, एक महिन्यापुर्वी न्यायालयाने दिलेले आदेश महापालिकेला मिळाले नव्हते. परंतू काल याची प्रत मिळाल्यानंतरर तातडीने प्रतिज्ञापत्र देण्यात आले. येत्या दोन तीन दिवसांत ही रक्कम देण्यात येईल. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror