Dailyhunt
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | जेठालाल राहणार एकाकीच.?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | जेठालाल राहणार एकाकीच.?

'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रमातू दिशा वकाणीनं लग्नानंतर मालिकेतून ब्रेक घेतला. ती गरोदर असतानाही शोसाठी शूटिंग करत होती. परंतु, मुलीच्या जन्मानंतर तिनं ब्रेक घेतल्यानंतर ती पुन्हा शोमध्ये परतलीच नाही.

अशातच आता जेनिफर मिस्त्रीनं दिशा पुन्हा कधीच 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये झळकणार नाही आणि त्यामागे काही कौटुंबिक कारण असल्याचंही तिनं म्हटलं आहे. जेनिफर दिशा वकाणीबद्दल म्हणाली, "जेवढं आम्ही ऐकलंय, त्यानुसार तिच्या कुटुंबाच्या काही अटी होत्या की रविवारी शूटिंग नाही करायचं. रात्रीचं शूट नाही करायचं आणि जास्त तास काम नाही करणार वगैरे. त्यामुळे तडजोड तरी किती करणार."

जेनिफर मिस्त्री म्हणाली, 'दिशा तर पुन्हा येणार नाही. दया आली तर येईल.' जेनिफर म्हणाली दयासाठी दुसऱ्या कोणाची निवड होऊ शकते; पण दिशा वकाणी पुन्हा ते पात्र साकारणार नाही. ती याबद्दल पुढे म्हणाली, "दिशा मधे एकदा येणार होती. ती आमच्याशी बोलली होती त्याबद्दल २०२१ दरम्यान. ती आलेली. दुसऱ्या दिवसापासून तिचं शूट होतं. ड्रेस वगैरे ट्राय करून गेलेली; पण त्यानंतर त्यांच्यामध्ये काय झालं ते माहीत नाही आणि ती पु्न्हा आली नाही."

गेली जवळपास दोन दशकं हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. परंतु, या काळात चित्रपटातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी शोमधून एक्झिट घेतली. निर्माते असित मोदी यांच्याबरोबर अनेकांचे खटके उडाले असल्याचं मालिकेतून बाहेर पडलेल्या कलाकारांनी मुलाखतींमधून सांगितलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे जेनिफर मिस्त्री.

जेनिफर मिस्त्री शोमधून बाहेर पडल्यानंतर अनेकदा चर्चेत आली. ती अनेकदा तिचा मालिकेत काम करतानाचा आणि सहकलाकारांबरोबरचा अनुभव याबद्दल बोलताना दिसते. ती मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकाणीबद्दलही बोलत असते. अशातच आता 'बॉलीवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत ती याबद्दल पुन्हा एकदा बोलली आहे. यावेळी तिनं दिशा वकाणी आता मालिकेत पुन्हा कधीच येणार नाही, असं म्हटलं आहे.

दिशा वकाणीनं कित्येक वर्षे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दया हे लोकप्रिय पात्र साकारलं आहे. दया व जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी व दिशा वकाणी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडायची. आजही या कार्यक्रमातील जुन्या एपिसोडमधील त्यांचे सीन, संवाद सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळेच दिशा वकाणीनं या शोमधून एक्झिट घेतल्यापासून तिचे चाहते तिला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु, कित्येक वर्षांपासून फक्त ती पुन्हा येणार, असं म्हटलं जात आहे; मात्र तिचा कमबॅक काही झाला नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror